सर्व विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रक्कमेच्या 25 टक्के
आगाऊ रक्कम मिळण्यासाठी पिक विमा कंपनीकडे पाठपुरावा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिच्या अनुषंगाने निर्गमित अधिसूचनांनुसार सर्व विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रक्कमेच्या 25 टक्के आगाऊ रक्कम देणे बाबत पिक विमा कंपनीस जिल्हास्तरीय बैठकांमध्ये तसेच वेळोवेळी लेखी पत्राद्वारे सूचना देऊनही पिक विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई देणे बाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.
अधिसूचनेनुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम देणेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सोलापूर यांनी अपर मुख्य सचिव कृषि विभाग मंत्रालय मुंबई व आयुक्त कृषि महाराष्ट्र राज्य यांचेशी दुरध्वनीद्वारे तसेच कृषि मंत्री महाराष्ट्र राज्य यांचेशी प्रत्यक्ष चर्चा करुन याबाबत पाठपुरावा केला आहे. परंतू अद्यापपर्यंत पिक विमा कंपनीमार्फत शेतकऱ्यांना 25 टक्के आगाऊ रक्कम देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही केलेली नाही. या अनुषंगाने संबंधित विमा कंपनीकडे पाठपुरावा करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत सोलापूर जिल्हयात माहे जुलै ऑगस्ट मध्ये बहुतांश महसूल मंडळामध्ये पावसात खंड पडलेला असल्याने खरीप ज्वारी, सोयाबीन, तूर, भुईमुग, मका, बाजरी कांदा, कापूस या पिकाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता लक्षात घेता प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत तरतुदीच्या अनुषंगाने हंगामातील प्रतिकुल परिस्थितीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या चालू वर्षीच्या अपेक्षित उत्पादनामध्ये मागील 7 वर्षातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत 50 टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर सदर अधिसुचित महसूल मंडळ / अधिसुचित तालुका नुकसीनच्या प्रमाणात नुकसान 'भरपाईसाठी पात्र राहतील व उंबरठा उत्पन्नाच्या आधारे येणाऱ्या विमा नुकसान भरपाईच्या 25 टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे.
त्यानुसार पावसाचा खंड 3 ते 4 आठवडे असलेल्या अधिसूचित तालुका / मंडळामध्ये सर्वेक्षण करण्यात येऊन त्याअनुषंगाने 50 टक्के पेक्षा जास्त उत्पादनात घट असलेल्या एकुण 92 महसूल मंडळे व 8 तालुक्यांकरिता पिकनिहाय अधिसूचना निर्गमीत करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांच्या सर्व पात्र विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रक्कमेच्या 25 टक्के आगाऊ रक्कम देणेबाबत पिक विमा कंपनीस आदेशित करण्यात आलेले आहे.
यासोबतच जिल्ह्यातील उर्वरीत 17 महसूल मंडळे व 3 तालुक्यांमध्ये सुध्दा 3 आठवड्यांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडलेला होता. परंतू यादरम्यान मध्यतंरी एखाद दुसरा दिवस अत्यंत किरकोळ प्रमाणात पाऊस पडल्यामुळे पावसाच्या खंडामध्ये तांत्रिक खंड पडलेला आहे अशा महसूल मंडळामध्ये सुध्दा पावसाच्या खंडामुळे पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालेले असल्याने सदर महसूल मंडळे / तालुके यांचे सुध्दा विशेष बाब म्हणून नुकसानीच्या संबंधाने सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना संभाव्य नुकसान भरपाई रक्कमेच्या 25 टक्के आगाऊ रक्कम देणे बाबत अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment