Hot Posts

6/recent/ticker-posts

संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियानात भोसे ला विभागीय स्तरावर विशेष पुरस्कार

 संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियानात भोसे ला विभागीय स्तरावर विशेष पुरस्कार 


सिईओ आव्हाळे यांनी केले अभिनंदन ..!

…………………………….

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- - संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियानात पॅढरपूर तालुक्यातील भोसे ग्रामपंचायतीस आबासाहेब खेडकर विशेष पुरस्कार जाहिर झाला आहे.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२०-२१ व २१-२२ या आर्थिक वर्षात पॅढरपूर तालक्यातील भोसे या ग्रामपंचायतीस विशेष पुरस्कार जाहिर झाला आहे. 

या विशेष पुरस्कारा बद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी सरपंच गणेश पाटील व ग्रामविकास अधिकारी शरद भुजबळ यांचे अभिनंदन केले आहे. 

विभागीय उपायुक्त विजय मुळीक व त्यांचे सहकारी टीम ने या गावाची पाहणी केली होती. गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांचे देखील या ग्रामपंचायतीच मोलाचे सहकार्य मिळाले आहे. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानात ही भोसे ग्रामपंचायत जिल्ह्यात पहिली आहे. 

या ग्रामपंचायतीने लोकसहभागातून विविध उपक्रम राबविले आहेत. वृक्षारोपना बरोबर क्युआर कोड द्वारे ग्रामपंचायतीचा टॅक्स जमा केला जातो.

व्हाटसअॅप बनला 

स्वच्छता संवाद वाहिनी …! 

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत स्वच्छतेसाठी गाव पातळी वर संवाद साधणे खुप अवघड असते. लोकांना वेळेत माहिती पोहोचविणे साठी गावातील सर्व कुटूंबातील एक सदस्य व्हाटसअॅप ग्रुप शी जोडला आहेत. वीजेच्या वेळा, गावातील स्वस्त धान्य दुकान, गॅस, आदी विविध सुविघा या ग्रुप वर देणेत येतात. स्वच्छतेचे बाबतीत विविध व्हीडीओ लिंक देऊन ग्रामस्थांचे पाणी व स्वच्छते विषयी प्रबोधन केले जाते. एका क्लिक वर स्वच्छतेचा मेसेज पाच हजार लोकांपर्यंत क्षणात जातो. या स्वच्छता संवाद वाहिनीचा उपयोग गावातील सर्व लोकां पर्संत पोहचणे साठी होतो.

लोकसहभागातून २० लक्ष रूपसे गोळा करून रुग्णवाहिका सुरू केली आहे. आझादी का अमृत महोत्सव तसेच विविध नाविणपुर्ण उपक्रम सा ग्रामपंचायतीन् राबविले आहेत. 

ग्रामस्थांचे सहकार्यामुळे विशेष पुरस्कार

-ग्रामविकास अधिकारी शरद भुजबळ 

सर्व शाळा, माध्यमिक शाळा, बचतगट , यांनी सरपंच गणेश पाटील यांचे आवाहनास प्रतिसाद देऊन चांगले काम केले. लोकसहभागातून विविध उपक्रम राबविले मुळे पुणे विभागात दखल घेतली. जिल्हा परिषदेचा पाणी व स्वच्छता विभाग व ग्रामपंचायत विभाग, पंचायत समिती पंढरपूर यांचे सहकार्य मिळाले असल्याचे ग्रामविकास अधिकारी शरद भुजबळ यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments