Hot Posts

6/recent/ticker-posts

. तर सरकार विरोधात 15 ऑगस्ट रोजी पत्रकार संघटना काळ्या फिती लावून करणार निषेध

 . तर सरकार विरोधात 15 ऑगस्ट रोजी पत्रकार संघटना काळ्या फिती   लावून करणार निषेध

. तर सरकार विरोधात 15 ऑगस्ट रोजी पत्रकार संघटना काळ्या फिती   लावून करणार निषेध

 जळगाव येथील पत्रकार संदीप महाजन यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी

 कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):-

   गुरुवारी सकाळी जळगाव येथील पत्रकार संदीप महाजन यांना तेथील स्थानिक आमदार किशोर पाटील यांच्या समर्थकांनी मारहाण केली होती या घटनेचा माढा तालुका व कुर्डूवाडी श्रमिक पत्रकार बांधवांच्या वतीने प्रांत अधिकारी यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला. प्रांत अधिकारी यांच्या वतीने नायब तहसीलदार रवी कदम  यांनी निवेदन स्वीकारले. 

     पत्रकार संदीप महाजन यांच्या वरती हल्ला होण्या अगोदर दोन दिवसापूर्वी स्थानिक आमदार किशोर पाटील यांनी फोन करून पत्रकार संदीप महाजन यांना अर्वाच्य  भाषेत शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली होती. त्यांनी त्यासाठी स्वरक्षणासाठी  पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली असता परंतु पोलीस संरक्षण न मिळाल्यामुळे त्यांच्यावरती हल्ला झाल्याची ही बाब गंभीर आहे.

    मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पत्रकार संदीप महाजन यांनी बातमी दिली म्हणून त्यांना फोनवरून धमकी आणि नंतर मारहाण केली गेली. ही घटना अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारी आहे. एकीकडे " मेरी मिट्टी मेरा देश"  हे अभिमान साजरे करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. याचवेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जातो हे देखील निंदनीय असल्याचे निवेदनात पत्रकारांनी म्हटले आहे.

     सदर निवेदनावरती पत्रकार लक्ष्मण कांबळे, हर्षल बागल, राहुल धोका,वसंत कांबळे विनायक दीक्षित, सतीश महिंगडे, शिरीष कुमार महामुनी यांच्या सह्या आहेत. 

    चौकट

 " गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांनी ॲक्शन घ्यावी " 

एका बाजूला लोकशाहीचा उदो उदो करायचा आणि दुसऱ्या बाजूला पत्रकारांची मुस्कटदाबी करायची महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी घटना आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्लेखोरावरती कठोर कारवाई करून कडक ॲक्शन घ्यावी अन्यथा  15 ऑगस्ट पूर्वी कारवाई न झाल्यास पत्रकार संदीप महाजन यांना व त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने पोलीस संरक्षण न दिल्यास माढा तालुक्यातील सर्व पत्रकार काळ्याफिती लावून राज्य सरकारचा निषेध व्यक्त करतील. 

Reactions

Post a Comment

0 Comments