दिगंबर ढेपे यांचा अमृत महोत्सवानिमित्त बाळे येथे होणार नागरी सत्कार..!
सत्कार समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन गुरव यांची माहिती..!!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असणारे विश्वकृपा विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर ढेपे यांचा अमृत महोत्सव 11 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता व्हि.डी. ढेपे स्कूल बाळे, बार्शी रोड येथील प्रांगणात नागरी सत्कार आयोजित करण्यात आल्याची माहिती अमृत महोत्सव सत्कार समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन गुरव यांनी श्रमिक पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मल्लिकार्जुन गुरव म्हणाले, सामाजिक आणि शैक्षणिक तसेच सहकार क्षेत्रामध्ये भरीव कार्य केल्यामुळे दादांचा आदर्श आजच्या तरुणाईने घेण्याची गरज आहे.
आणि त्यामुळेच आम्ही त्यांचा अमृत महोत्सवानिमित्त नागरी सत्कार आयोजित केलेला असून हा भव्य दिव्य सत्कार माजी पालकमंत्री तथा शहर उत्तरचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अमृत हस्ते संपन्न होणार आहे.
तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान सोलापूर दक्षिणचे माजी आमदार दिलीपराव माने भूषविणार आहेत.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार तथा राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयराज शिंदे यांची आवर्जून उपस्थिती आहे.
यामृत महोत्सव कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मनोरमा परिवाराचे संस्थापक तथा सहकार पंढरीचे पांडुरंग श्रीकांत मोरे, आरपीआय आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, तुळजाभवानी सहकारी साखर कारखाने चेअरमन सुनील चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा अमृत महोत्सवी सत्कार समारंभ उत्कृष्ट पद्धतीने संपन्न होण्यासाठी अमृत महोत्सव सत्कार समितीची स्थापना करण्यात आली असून त्यात
डॉक्टर, उद्योजक, साहित्य ,कला, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश करण्यात आला आहे.
या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा अमृत महोत्सव सत्कार समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन गुरव, राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे उपाध्यक्ष शशिकांत जि ड्डीमनी, प्रदेश कार्यकारणी सदस्य चंद्रकांत गुरव, काशिनाथ मेल गिरी, बसवराज तेलगाव, महादेव स्वामी, सोलापूर जिल्हाध्यक्ष लिंगराज विंचुरे, श्रीकांत बोरगावकर, खंडोबा देवस्थान ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष विनय ढेपे उपस्थित होते.
0 Comments