२५१, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातून
काँग्रेस पक्षाकडून धनगर समाजालाच उमेदवारी मिळावी
ही आग्रहाची मागणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-महाराष्ट्र राज्यात सध्या धनगर समाजाची लोकसंख्या ही सुमारे दोन कोटी इतकी आहे परंतु आज महाराष्ट्रातून काँग्रेस पक्षाचा धनगर समाजातील एकही आमदार नाही. काँग्रेस पक्षाकडून या समाजास जनगणनेच्या अहवालानुसार संपूर्ण महाराष्ट्रातून जात निहाय जनगणनेनुसार धनगर समाजास विधानसभेचे तिकिट देण्यात यावे.
सध्या महाराष्ट्र राज्यात ३५७ तालुके असून यापैकी १५० तालुक्यात धनगर समाज हा बहुसंख्येने आहे. तरी त्या त्या तालुक्यात धनगर समाजास विधानसभेसाठी काँग्रेस आय पक्षाकडून एकूण ७८ मतदार संघात सर्व्हेनुसार तिकिट देण्यात यावे. सध्या २५१, दक्षिण सोलापूर मतदार संघात धनगर समाजाची लोकसंख्या सुमारे ९०,००० एवढी आहे.
सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुका, पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ तालुका, करमाळा तालुका, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट तालुका, उत्तर सोलापूर व माढा तालुका येथे धनगर समाज हा बहुसंख्येने असून देखील धनगर समाजास विधानसभेचे तिकिट देताना दरवेळी डावलले जाते. यामुळे धनगर समाजात असंतोष पसरला आहे. कै. आनंदराव देवकते साहेब ( माजी कॅबिनेट मंत्री ) यांनी काँग्रेस पक्षासाठी फार मोठा त्याग केला असून स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ व साधता एका क्षणात त्यांनी राजीनामा देऊन फार मोठा त्याग केला आहे. देवकते साहेब यांचे नेतृत्व सर्व समाजाचे लोक मानत होते व ते सर्व समाजातील लोकांना बरोबर घेऊन जात होते. तेव्हापासून आजतागायत जवळ जवळ २० वर्षापासून दक्षिण सोलापूर मतदार संघास धनगर समाजास आमदारकीपासून वंचित ठेवण्यात आले आहे ही अतिशय खेदाची बाब आहे. तरी येत्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातून धनगर समाजासच उमेदवारी देण्यात यावी अशी आमची आग्रही मागणी आहे.
जर येत्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाजास विधानसभेत तिकिट दिले गेले नाही तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षास फार मोठे नुकसान सहन करावे लागेल. दक्षिण सोलापूरचे आमदार कै. आनंदराव देवकते हे काँग्रेस पक्षाकरीता सतत झटले आहेत. व काँग्रेस पक्षासाठी ते त्यांच्या मृत्युपर्यंत एकनिष्ठ राहिले आहेत. तरी काँग्रेस पक्षास याबाबत आत्मचिंतन करणे अतिशय गरजेचे आहे. आतापर्यंतच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अनुकुल वातावरण असूनदेखील काही ठिकाणी धनगर समाजास तिकिट नाकारले गेले आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रातून धनगर समाजाचा एकही खासदार नसल्याने महाराष्ट्र राज्यातील सर्व धनगर समाजात प्रचंड नाराजी पसरली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार प्रणितीताई शिंदे यांना निवडून आणण्यात धनगर समाजाचा सिंहाचा वाटा आहे.
तरी आम्ही गुरुपोर्णिमेच्या रोजीपासून गेल्या महिनाभरात संपूर्ण दक्षिण सोलापूर मतदार संघातील जवळ जवळ ८० ते ९० गावांचा गावभेट दौरा केला व तेथील संपूर्ण धनगर समाज व इतर बहुजन समाज बांधवांशी देखील संवाद साधला. या गावभेट दौयास फारच चांगला प्रतिसाद मिळाला. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर धनगर समाज व इतर बहुजन समाज बांधवांचा दक्षिण सोलापूर मतदार संघात मध्यवर्ती ठिकाणी महामेळावा आयोजित करणार आहोत व सदर मेळाव्यात एक कमिटी स्थापन करुन ठराव पास करुन पुढील निर्णय जाहिर करुन शिष्टमंडळाव्दारे काँग्रेस पक्षश्रेष्ठींना निवेदन देण्यात येणार आहे. तरी धनगर समाजातील गरीबातील गरीब अशा उच्चशिक्षित ( डॉक्टर, वकिल, इंजिनिअर ) निष्ठावंत कार्यकर्ता व अशा तरुण सुशिक्षित उमेदवारास उमेदवारी देण्यात यावी अशी धनगर समाजाच्या वतीने मागणी आहे.
तरी येत्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूर मतदार संघातून धनगर समाजासच उमेदवारी देण्यात यावी असे आजच्या पत्रकार परिषदेत धनगर समाजाचे आंदोलक सिद्राम चोपडे, अप्पाराव हाके व रावसाहेब व्हनमाने यांनी म्हटले.
सदर पत्रकार परिषदेस सिद्राम चोपडे, अप्पाराव हाके, रावसाहेब व्हनमाने, राजु बल्लारी, राम शिनीवडीयार, प्रा. देवेंद्र मदने, कल्याणी कोकरेसर उपस्थित होते.
0 Comments