सोलापूर जिल्ह्यात 'रेशीम मार्केट' सुरू करण्यासाठी प्रयत्नशील : उपसंचालक ढवळे
▪️ कुरुल येथे रेशीम शेतीला दिली भेट
कुरूल (कटूसत्य वृत्त):-
शेतकऱ्यांना सदन, विकसनशील आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी शेतीला रेशीम शेती हा उत्कृष्ट पर्याय आहे. शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे लक्ष दिले, शेतातील रेशीम आळी ला जपले तर आर्थिक प्रगती होईल. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाजारपेठे अभावी तारेवरची कसरत करावी लागत आहे.शासनाने कोट्यवधी रुपयांचा खर्च करून सोलापूर जिल्ह्यातील हिरज येथे रेशीम जिल्हा कार्यालयाची भव्य इमारत उभी केली आहे. केवळ काही लाखो रुपयांमुळे किरकोळ कामे राहिली आहेत. त्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करून लवकरात लवकर सोलापूर जिल्ह्यात मोठी बाजारपेठ तयार करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन रेशीम संचालनालय नागपूर, महाराष्ट्र राज्याचे उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी केले.
कुरुल (ता. मोहोळ) येथील रेशीम शेतीला भेट देण्यासाठी आले असता त्यांचा कुरुल ग्रामपंचायत येथे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा रेशीम अधिकारी विनीत पवार, पं.स. सदस्य जालिंदर लांडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, उपसरपंच पांडुरंग जाधव, ग्रामसेवक श्रीराम खरात, उत्कृष्ट शेतकरी सदाशिव कांबळे, भारत जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हा रेशीम अधिकारी विनीत पवार म्हणाले की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. तो जगला पाहिजे यासाठी त्याला आर्थिक बळ मिळाले पाहिजे. यासाठी व्यवसायिक शेती करणे गरजेचे असून कुरूल व परिसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम लागवडीत उतरलं पाहिजे.
यावेळी जालिंदर लाडे बाबासाहेब जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी रेशीम लेखाधिकारी पी.व्ही. मसणे, रशीम गटप्रमुख एस.वाय. जोजन, एम.जे. गवंड, गोपाळ कांबळे, सौदागर कांबळे, विजय कांबळे, दादासाहेब कांबळे, शुभम कांबळे, संतोष कांबळे, विशाल कांबळे, नितीन लामतुरे, मल्हारी कांबळे, सुरज कदम, सचिन जाधव, शरद कांबळे, लिपिक संतोष जाधव, ग्रामरोजगार सेवक अमोल खंदारे, संभाजी घोडके, खाजाभाई शेख आदी उपस्थित होते.
0 Comments