शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणा बरोबरच गुणवत्तेचे सार्वत्रिकीकरण होणे
आवश्यक आहे --केंद्रप्रमुख दिगंबर काळे
माढा (कटूसत्य वृत्त) गोरगरीब वंचित घटक शेतकरी कष्टकरी यांची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. शिक्षणाची गंगोत्री सर्वांच्या दारात प्रवाहीत करण्यासाठी आपण मेहनत घ्यावी लागेल शिक्षणाचा मूळ उद्देश सफल करण्यासाठी शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणा बरोबरच गुणवत्तेचे सार्वत्रिकीकरण होणें आवश्यक आहे असे मत! केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी उपळाई बुद्रुक केंद्राच्या शिक्षण परिषदेत कन्याप्रशालेत बोलताना व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, शिक्षण तर प्रत्येकापर्यंत पोहोचले पाहिजेच पण ते दर्जेदार असायला हवे प्रत्येक मुलांच्या क्षमता विकसित व्हाव्यात मुलांना आपण काय वाचतो काय लिहितो हे समजणं अत्यंत महत्त्वाचे आहे तो चिकित्सा करणारा विवेकशील माहितीगार असावा. या दृष्टीने आपले अध्यापन होणें अपेक्षित आहे. असे मत मांडले. विजय काळे विठोबा गाडेकर श्रीकांत काशीद धनाजी घाडगे यांनी ही उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले.
प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मंदाकिनी मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले परिषदेत विविध विषयाच्या चर्चेत विजय काळे सुहास चवरे श्रीकांत काशीद पाटील मडम साळुंके मम यांनी भाग घेतला.
प्रास्ताविक अनिल काळे यांनी केले तर सूत्रसंचालन साबळे यांनी केले.

0 Comments