रक्षाबंधन निमित्त सिटीस्कॅन मशीन ओवाळणी द्या.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना राखी पौर्णिमा
निमित्त राखी बांधून शासनाचे वेधले लक्ष .
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील दहा वर्षांपूर्वीची जुनी सीटी स्कॅन मशिन बंद पडली आहे. त्यामुळे अतिदक्षता विभागातील रुग्णांची गैरसोय होत आहे . सीटी स्कॅन मशिनसाठी जिल्हा नियोजन समिती, राज्य व केंद्र सरकारकडे निधीची मागणी करून सुद्धा अद्याप हि निधी उपलब्ध झाला नाही त्यामुळे शासन चे लक्ष वेधण्यासाठी हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय बी ब्लॉक येथे अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा करण्यात आला.
वर्षाचा कालावधी झाला असून, अद्यापही सदरचे सिटी स्कॅन मशिन बंदच आहे. जिल्हा रुग्णालयात जिल्हाभरातून उपचारांसाठी दररोज शेकडो रुग्ण येतात. यातील बहुतांश रुग्णांची सिटी स्कॅन करण्याची आवश्यकता असते.
बाहेर खासगी रुग्णालयांत हजारो रुपये सिटी स्कॅनसाठी मोजावे लागतात. मात्र, तेच जिल्हा रुग्णालयात मोफत होत असल्याने शेकडो रुग्णांसाठी मोठा दिलासा होता. परंतु रुग्णालयातील सिटी स्कॅन मशिन बंद असल्याने रुग्णांना व्हेंटिलेटर ची सुविधा असलेल्या ॲम्बुलन्स मधून सिटीस्कॅन करण्यासाठी इतर रुग्णालयात जावे लागते. त्यासाठी गोरगरीब रुग्णांना परिस्थिती नसतानाही ॲम्बुलन्स खर्च व सिटीस्कॅन चा खर्च व्याजाने पैसे काढून करावे लागत आहे
अनेक गंभीर रुग्ण सिटी स्कॅन चाचणीच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे अनेक सर्वसामान्य रुग्णांना मनःस्ताप सहन करावा लागतो. तर, सिटी स्कॅन बंद असल्याने अनेक रुग्णांवरचे उपचारही खोळंबले आहेत.
शासनाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना पाच लाखापर्यंत मोफत उपचार करण्याची घोषणा करण्यात आली पण ती फक्त कागदावरच राहिलेली आहे सर्वसामान्य नागरिकांना कुठल्याही हॉस्पिटलमध्ये या योजनेचा लाभ दिला जात नाही गोरगरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाळाटाळ केली जाते त्यामुळे सदर योजनेची घोषणा न करता संबंधित रुग्णालयाला सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपचार करणे बंधनकारक करावे तसे कायदे करावेत अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले कार्याध्यक्ष अरविंद शेळके उपाध्यक्ष सिताराम बाबर ओंकार कदम नागनाथ कोरे शेखर कंटीकर भीमा घोडके अमोल सलगर ज्ञानेश्वर पवार लखन गायकवाड शेखर चौगुले अण्णा सावंत जिल्हा सचिव राजेंद्र माने अनिल गवंडी किरण कदम दूर्वा मोठे अमृता मोठे स्वरूपा मेरु ऋतुजा पराडकर शुभांगी लचके आर्या लचके श्रेया लचके आधी उपस्थित होते.

0 Comments