डॉ.विश्वनाथ आवड यांना इनरव्हिल क्लबच्या वतीने नेशन बिल्डर अँवार्डने सन्मानीत.
अकलूज (कटूसत्य वृत्त):-इनरव्हिल क्लब सोलापूर व अकलूज यांचे विद्यमाने शिक्षक दिनाचे निमीत्ताने नेशन बिल्डर या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते.
या सन्मान सोहळास सौ.सत्यप्रभादेवी रणजितसिंह मोहिते पाटील व सिने अभिनेते मिलींद गुणाजी यांचे हस्ते पार पडला. डॉ.प्रा.विश्वनाथ आवड यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक कार्याची दखल घेवून इनरव्हिल या सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांना सन्मानीत करण्यात आले. या सन्मान सोहळ्याप्रसंगी सोलापुर जिल्हा व माळशिरस तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणा-या 20 व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.श्रध्दा जवंजाळ व इनरव्हिलचे सर्व सदस्य यांनी केलेले होते.यासन्मान सोहळा प्रसंगी डिस्टीक प्रमुख शुक्ला मँडम,डॉ.देवडीकर,डॉ.गवळी,डाॅ.सिद,डॉ.कांबळे यांचे सह सर्व सन्मानार्थी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इनरव्हिलच्या सर्व सदस्य व सहारा इस्टीट्यूटचे सहकारी यांनी प्रयत्न केले.

0 Comments