Hot Posts

6/recent/ticker-posts

टेंभुर्णीत छत्रपती संभाजी महाराज नामफलकाचे उद्घघाटन

 टेंभुर्णीत छत्रपती संभाजी महाराज नामफलकाचे उद्घघाटन


टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- टेंभुर्णी तालुका माढा येथे नजीक असलेल्या हनुमान तालीम संघ छत्रपती संभाजी महाराज नामपलकाचे उद्घाटन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन बापू जगताप,पोलीस पाटील कल्याणराव पाटील, टेंभुर्णीचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ थोरात यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
           टेंभुर्णी येथील जुन्या नँशनल हायवे लगत असलेल्या नविन मार्श हाँस्पिटल पासून व सुर्ली रोड पर्यंतच्या सर्व परिसरातील नागरिकांनी टेंभुर्णी ग्रा . पं .कडे केलेल्या मागणीनुसार, व ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावानुसार ,त्या परिसराची ओळख श्री छत्रपती संभाजीनगर म्हणून असावी, अशा प्रकारच्या मागणीनुसार त्या भागाला शनिवार दि. 26 रोजी  श्री.छत्रपती संभाजीनगर असे नाव देण्यात आले.  
         यावेळी टेंभुर्णीचे सामाजिक कार्यकर्ते गोरखबप्पा देशमुख,शेतकरी संघटनेचे नेते विठ्ठलआबा मस्के पाटील ,मराठा सेवा संघाचे विजय काका काळे,नितीन मुळे-ता.संघटक संभाजी ब्रिगेड, जाणता राजा मित्र मंडळाचे अध्यक्ष वैभवभैय्या देशमुख, स्वराज्य ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, माढा तालुका टायगर ग्रुपचे अध्यक्ष लखन माने, शहाजीनाना अटकळे, टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य शैलेश ओहोळ, आप्पासाहेब हवालदार, भाऊसाहेब देशमुख ,राजेंद्र केदार, प्रशांत डोके, धनंजय महाडिक ,शहाजी क्षीरसागर, नारायण पाटील,प्रशांत देशमुख, बालाजी महाडिक आकाश भरगंडे,रणजीत आटकळे,विशाल पवार आदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते...
Reactions

Post a Comment

0 Comments