Hot Posts

6/recent/ticker-posts

आजचे विद्यार्थी उद्याचे देशाचे उज्वल भविष्य: आयपीएस अधिकारी नयोमी साटम

 आजचे विद्यार्थी उद्याचे देशाचे उज्वल भविष्य: आयपीएस अधिकारी नयोमी साटम 


श्री महालिंगराया हायस्कूल मध्ये निर्भया शिबिर संपन्न: विद्यार्थ्यांशी संवाद
मंगळवेढा (कटूसत्य वृत):-
 विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरची स्वप्न पाहताना कंजूसपणा करू नका .त्याकरीता पैसे लागणार नाही. मात्र जिद्द ,कष्ट, मेहनत करण्याची तयारी ठेवा, आपण नक्की यशस्वी व्हाल. विद्यार्थी दशेतील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचा पाया मजबूत असला पाहिजे तरच पुढील वाटचाल सुकर होते. स्वतःला शिस्त संस्कारक्षम वर्तन आचरणात आणावे लागेल. ध्येयाची सुरुवात लवकर करा व लक्ष केंद्रित करा. मोबाईलमध्ये देशातील चांगली पिढी भरकटत आहे. यासाठी देशाचे चांगले नागरिक बना. आजचे विद्यार्थी हे उद्याचे उज्वल भविष्य असल्याचे प्रतिपादन आयपीएस अधिकारी तथा मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या प्रभारी प्रशिक्षणार्थी अधिकारी श्रीमती नयोमी दशरथ साटम यांनी केले.
        श्री महालिंगराया हायस्कूल हुलजंती (ता.मंगळवेढा) या प्रशालेत निर्भया प्रबोधन शिबिराप्रसंगी बोलत होत्या. याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन नयोमी साटम यांच्या हस्ते करण्यात आले.
      यावेळी मुख्याध्यापक आर.एम. कडीमाळी, मंगळवेढा पोलीस ठाण्याचे गोपनीय विभागाचे दिगंबर  गेजगे, हुलजंतीचे पोलीस पाटील जिवाजी सोनवले, येळगीचे पोलीस पाटील राजश्री इंगवले, सायरा मुल्ला,जितेंद्र कदम, के.एस. बिराजदार, चिदानंद कुंभार,भागांणा बड्डे, विजय रूपनूर,दुंडाप्पा माळी,सुरेश करपे, मनगेनी येड्डे, कांताप्पा बिराजदार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
   साटम पुढे म्हणाले, आपण किती महत्त्वाचे आहे लक्षात घेतलं पाहिजे. शिक्षण घेताना यापूर्वी अनंत अडचणी येत होत्या परंतु आज शिक्षणाच्या सुविधा सहजपणे उपलब्ध होत आहेत . महिला सक्षमीकरणामुळे आज बदल दिसत आहेत. तसेच देशातील सर्वात मोठी शक्ती युवा पिढी आहे. परंतु ९० टक्के युवक मोबाईल मध्ये विविध गेम्स, व्हाट्सअप वेगवेगळ्या सोशल साइटवर भरकटच चाललेचे विदारक चित्र आहे.यात अमूल्य वेळ वाया घालवत आहेत.म्हणून विद्यार्थ्यांनी मोबाईल पासून दूर राहावे गरजेनुसारच वापर करावा. 
    चौकट
     आयपीएस पोलीस अधिकारी साटम यांचे विद्यार्थ्यांची संवाद.
      नयोमी साटम (IPS) यांनी अवघ्या २२व्या वर्षी  केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादन केले आहे. त्यांनी गेल्या महिन्यात मंगळवेढा येथे प्रशिक्षणार्थी प्रभारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. मंगळवेढ्यातील गुन्हेगारी जगतावर चांगलाच जरब,वचक निर्माण केला आहे, अवैद्य धंद्यावर धाडसत्र सुरूच आहे. साहजिकच विद्यार्थ्यांच्यात त्यांच्याबद्दल कुतुहूल होते. परंतू महालिंगराया हायस्कूल हुलजंती येथील विद्यार्थ्यां व विद्यार्थिनीशी मनमोकळेपणाने संवाद साधला. आवर्जून विद्यार्थीदशेत इयत्ता सातवी पासूनच ध्येय निश्चित केले होते म्हणून या पदापर्यंत गवसणी घालण्याचे यश मिळाले आहे. विद्यार्थिनीनी त्यांच्याशी मनमोकळेपणाने करिअरबद्दल प्रश्न विचारले.
Reactions

Post a Comment

0 Comments