Hot Posts

6/recent/ticker-posts

शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचा माढ्यात निषेध

 शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचा माढ्यात निषेध,



पत्रकार मारहाण प्रकरणी आमदार पाटलांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची माढा पत्रकार संघाची मागणी

माढा  (कटूसत्य वृत):-
शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार संदीप महाजन यांना शिविगाळ करुन जीवघेणा हल्ला केल्याच्या निषेधार्थ आता पत्रकार संघटना आक्रमक होऊ लागल्या आहेत.
माढा पत्रकार संघाच्या वतीने आमदार किशोर पाटील यांचा निषेध करुन गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.पत्रकार संदीप महाजन यांना व त्यांच्या कुटूबियांना देखील पोलिस संरक्षण देण्याची मागञी करण्यात आली आहे.
आमदार पाटील यांचेवर गुन्हा दाखल न केल्यास शासकीय कार्यक्रमात माढ्यातील पत्रकार काळ्या फिती लावून सहभागी होण्याचा इशारा माढा पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे तहसील प्रशासन व पोलिस प्रशासनाला देण्यात आले आहे.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जळगांव येथील पत्रकार संदीप महाजन यांना तेथील स्थानिक आमदार किशोर पाटील यांच्या समर्थकांनी मारहाण केली आहे.वास्तविक पाहता गेल्या दोन दिवसांपूर्वी आमदार किशोर पाटील यांनी फोन वरून पत्रकार संदीप महाजन यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली होती त्यावेळी त्यांनी पोलीसांकडे संरक्षणाची मागणी केली होती परंतु त्यांना संरक्षण दिले गेले नाही आणि आज सकाळी त्यांना मारहाण झाली ही बाब अतिशय गंभीर आहे.मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पत्रकार संदीप महाजन यांनी बातमी दिली म्हणून त्यांना फोनवरून धमकी आणि नंतर मारहाण केली गेली ही घटना अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारीआहे एकीकडे मेरी मिट्टी मेरा देश हे अभियान साजरे करण्याचे आवाहन पंतप्रधानानी केले आहे.त्याच वेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला जातो आहे हे निंदनीय आहे.ज्या ठिकाणी पत्रकारास मारहाण झाली तो चौक त्यांचे दिवंगत वडील स्वातंत्र्य सैनिक आहेत.त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ चौकास नाव दिले आहे.तेथेच झालेली मारहाण निषेधार्ह आहे. त्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करीत आहोत १५ ऑगस्ट पूर्वी कारवाई न झाल्यास आणि पत्रकार संदीप महाजन यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने पोलिस संरक्षण देण्यात यावे अन्यथा पत्रकार काळ्या फिती लावून शासकीय कार्यक्रमात सहभागी होतील याची नोंद घ्यावी आहे.तहसीलदार विनोद रणवरे यांनी निवेदन स्वीकारले.यावेळी अध्यक्ष मदन चवरे,प्रमोद गोसावी,उपाध्यक्ष उल्हास सोनार,लक्ष्मण राऊत,संदीप शिंदे,अमर गायकवाड,गणेश गुंड,शेखर म्हेत्रे,विजय शिंदे,समाधान लटके यांचेसह माढा प्रेस क्लबचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.पत्रकार हल्ला प्रकरणातील राज्यातील पहिला निषेध माढा पत्रकार संघाच्या वतीने नोंदविण्यात आला आहे
Reactions

Post a Comment

0 Comments