महास्वयंम वेबपोर्टलवर तक्रार नोंदविण्यासाठी ई-मेल आयडी सुरू
सोलापूर (कटूसत्य वृत):- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महास्वययंम (www.mahaswayam.gov.in) वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे.या वेबपोर्टलवरील ऑनलाईन सेवा घेतांना लाभार्थी घटकांना येणा-या अडचणी व तक्रारींची नोंद करुन त्याचे निराकरण करण्यासाठी support@ese.maharashtra.gov.in हा ई-मेल आयडी सुरु करण्यात आला आहे. या ई-मेल वर आपली तक्रारी व अडचणी नोंदण्यात यावी असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय (www.rojgar.mahaswayam.gov.in) महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (https://kaushalya.mahaswayam.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (https://kaushalya.mahaswayam.
महास्वयंम वेबपोर्टलवरील वरील ऑनलाईन सेवा घेतांना अडचणी व तक्रारींची नोंद करुन त्याचे निराकरण करण्यासाठी support@ese.maharashtra.gov.in हा ई-मेल आयडी सुरु करण्यात आला आहे. या ई-मेल वर आपली अडचणी नोंदण्यात यावी तसेच याबाबत अधिक माहितीसाठी या कार्यालयाच्या ०२१७-२९५०९५६ या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष भेटीद्वारे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्क चौक, सोलापूर येथे संपर्क साधावा. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे.
0 Comments