Hot Posts

6/recent/ticker-posts

द्राक्ष बागाांच्या संरक्षणासाठी प्लॅस्टिक कव्हर तंत्रज्ञानाची योजना

 द्राक्ष बागाांच्या संरक्षणासाठी प्लॅस्टिक कव्हर तंत्रज्ञानाची योजना

सोलापूर (कटूसत्य वृत):-अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान होते द्राक्ष बागांच्या संरक्षणासाठी प्लॅस्टिक कव्हर घटकाचा शासकीय योजनेत समावेश करण्यात आला आहे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत द्राक्ष पिकासाठी प्लॅस्टिक कव्हर 50 टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिले जाणार आहे.या योजनेसाठी अधिकाअधिक शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टल https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर  अर्ज करावेत  असे आवाहन जिल्हा अधिकक्षक कृषी अधिकारी डी. एस.गावसाने यांनी केले आहे.

             गारपीट व अवकाळी पावसापासून द्राक्ष बागांचे संरक्षण करणे, शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या व उच्च प्रतीच्या निर्यातक्षम द्राक्ष पिकांच्या उत्पादनासाठी आर्थिक सहाय्य करणे, फळबागांकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, ग्रामीण भागातील युवकांना कृषी क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा उद्देश असून,राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून प्लॅस्टिक कव्हरसाठी अनुदान मिळण्यासाठी नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, जालना, अहमदनगर व सातारा या जिल्ह्यामध्ये प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी 6 कोटी 14 लाख 4 हजार रुपये इतक्या अनुदान निधीस मंजुरी देण्यात आली आहे.

             महाडीबीटी प्रणालीवर योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना 20 गुंठे ते 1 एकरदरम्यान प्रतिलाभार्थी अनुदानाचा लाभ मिळेल. प्रतिएकरसाठी सुमारे 4 लाख 81 हजार 344 रुपये खर्चाचा अंदाज असून, अनुदानाची मर्यादा ही खर्चाच्या 50 टक्के म्हणजे 2 लाख 40 हजार 672 रुपये प्रतिएकर मंजूर आहे.

योजनेत सहभागासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये 7/12 उतारा (द्राक्ष पिकाच्या नोंदीसह), 8-अ उतारा, आधार कार्डाची छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती शेतकर्यांसाठी), विहित नमुन्यातील हमीपत्र, बंधपत्र, चतु:सीमा नकाशा आदींची आवश्यकता आहे.

तरी जिल्हयातील सर्वसाधारण ,अनुसुचित जाती, व अनुसुचित जमाती  व इतर सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टल https://mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावर  अर्ज करावेत . अधिक माहितीसाठी संबधीत नजीकच्या कृषी कार्यालयाशी  संपर्क साधवा. असे आवाहनही जिल्हा अधिकक्षक कृषी अधिकारी श्री गावसाने यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments