Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्यशासनाकडून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार

 राज्यशासनाकडून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार

        स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 5 सप्टेंबर पूर्वी अर्ज करावेत

       जिल्हा निवड समिती मार्फत गणेश मंडळांना भेट देऊन पाहणी

 

सोलापूर (कटूसत्य वृत):-राज्यात दिनांक 19 सप्टेंबर 2023 पासुन सुरू होणाऱ्या गणेशोत्वात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्यशासनाकडुन पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी जिल्हयातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी  मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या मेलवर दिनांक 5 सप्टेंबर 2023 पुर्वी अर्ज करावेत.  ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. प्राप्त झालेल्या प्रस्तावांची जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत प्रत्यक्ष गणेश मंडळांना भेट देऊन पाहणी करून  त्याचा अहवाल राज्यस्तरीय समितीकडे पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांनी दिली आहे.

प्राप्त प्रस्तावांची जिल्हा निवड समिती मार्फत या पुरस्कारासाठी निवड करण्याची कार्यपध्दत पुढील प्रमाणे राहिल-

या शासन स्पर्धेत , धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे  परवानगी घेतलेल्या  किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या गणेशात्सव मंडळाना सहभागी होता येईल .सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची पुरस्कारासाठी निवड पुढील निकषांच्या आधारे करण्यात येईल. यासाठी आवश्यक गुणांकनाची बाब व गुण पुढील प्रमाणे राहतील.

             पर्यावरण पुरक मूर्ती - 10 गुण , पर्यावरण पुरक सजावट –(थर्माकोल / प्लास्टिक विरहीत ) 15 गुण ,ध्वनीप्रदूषण रहीत वातावरण -5 गुण, पाणी वाचवा,मुलगी वाचवा , अंधश्रध्दा निर्मुलन इ. समाजप्रबोधन 1 सामाजिक सलोखा संदर्भात सजावट/ देखावा -20 गुण , तसेंच स्वातंत्रयाच्या चळवळी संदर्भात/ छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्यभिषेक वर्षानिमित्त सजावट / देखावा – 25 गुण , गणेशोत्सव मंडळाने रक्तदान शिबीर, वर्षेभर गड किल्ले संवर्धन, पर्यावरण रक्षण , शेंद्रिय शेती , सौरऊर्जाबद्दल जागरूकता निर्माण करणे , ॲम्बुलन्स चालवणे , वैदयकिय केंद्र चालवणे इ. सामाजिक कार्य  -20 गुण . शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी / विद्यार्थीनी यांच्या शैक्षणिक , आरोग्य इत्यादिबाबत केले कार्य ,महिला, ग्राणीण भागातील वंचित घटक यांच्या शैक्षिणिक / आरोग्य/ सामाजिक इत्यादीबाबत केलेले कार्य -15 गुण , पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा 10 गुण , पारंपारकि/ देशी खेळांच्या स्पर्धा -10 गुण,महिला ग्रामिण भागातील वंचित घटक यांच्या शैक्षणिक , आरोग्य, सामाजिक इत्यादी बाबत केलेले कार्य -15 गुण, गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा उदा. पाणी/ प्रसाधनगृह  ,वैद्यकीय प्रथमोपचार , वातुकीस अडथळा येणार नाही असे आयोजन, आयोजनातील शिस्त ,परीसरातील स्वचछता (प्रत्येक सुविधेस 5 गुण ) एकुण 25 गुण. असे या स्पर्धेसाठी एकुण एक ते दहा बाबीसाठी एकुण 150 गुण ठेवण्यात आलेले आहेत.

            वरिल बाबींची पुर्तता करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने करावयाचा अर्जाचा नमुना, पर्यटन व सांस्कृतीक कार्य विभाग  शासनाच्या पिरशिष्ट अ मध्ये आहे.  तसेच राज्य शासनाचे  संकेत स्थळ www.maharashtra.gov.in व पु.ल. देशपांडे  महाराष्ट्र कला अकादमी मुंबई यांच्या mahotsav.pid@gmail.com या इमेलवर 10 जुलै पासून ते 5 सप्टेंबर 2023 पूर्वी ऑनलाईन अर्ज करावेत . प्राप्त प्रस्तावांची जिल्हास्तरीय निवड समिती मार्फत गणेशोत्सवाला भेट देऊन  राज्य समिती कडे  शिफारस करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी श्री. गोडसे यांनी दिली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments