आत्मा व कृषी विभागाकडून 14 ऑगस्ट रोजी “रानभाजी महोत्सव” चे आयोजन
*नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर रानभाजी महोत्सवास भेट देण्याचे आवाहन
सोलापुर (कटूसत्य वृत):- रानभाज्यांचे महत्व प्रसारित करणे व विक्री साखळी निर्माण करणे करिता सन 2023-24 पासून दरवर्षी रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. आत्मा व कृषी विभागाच्या वतीने दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी फडकुले सभागृह येथे "रानभाजी महोत्सव" आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी या रानभाजी महोत्सवास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
हा महोत्सव क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिवसा निमित्ताने दिनांक 9 अॅगस्ट 2023 ते 15 अॅगस्ट 2023 या कालावधीमध्ये सप्ताह स्वरुपात राबविण्यात येत आहे. शेतशिवारातील रानभाज्यांचे आरोग्य विषयक महत्व सर्वसामान्य नागरीकांना होण्यासाठी व उत्पादक ते थेट ग्राहक अशी विक्री करण्यात येणार आहे.
दिनांक 14 अॅगस्ट 2023 वेळ- सकाळी 9.30 वाजता स्थळ- डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, श्री. सिध्देश्वर मंदीर जवळ, सोलापूर येथे आयोजित केले आहे. हा महोत्सवास जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, लोकप्रतिनिधी व इतर मान्यवर यांचे उपस्थितीत होणार आहे. आरोग्यदायी रानभाज्याचा लाभ नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन आत्मा व कृषि विभागा मार्फत करण्यात येत आहे.
0 Comments