Hot Posts

6/recent/ticker-posts

"पोलिस काका आणि पोलिस दिदी"ही अभिनव संकल्पना

"पोलिस काका आणि पोलिस दिदी"ही अभिनव  संकल्पना

माढा(कटूसत्य वृत):- जिल्ह्यात महाविद्यालयीन मुलींना सुरक्षेचा विषय महत्वाचा असुन ग्रामीण भागासह शहरी भागातील मुलींना  
सुरक्षा व त्याच्या अडचणी जाणुन घेण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने "पोलिस काका आणि पोलिस दिदी"ही अभिनव  संकल्पना येत्या १० दिवसात जिल्हात राबवणार असल्याची माहिती जिल्हा अतिरिक्त पोलिस अधिक्षक  हिम्मत जाधव यांनी माढ्यात पत्रकारांशी बोलताना दिली.
 माढा पोलिस ठाण्याच्या वार्षिक तपासणीच्या निमित्ताने हिम्मत जाधव माढ्यात आले होते.तपासणी नंतर  त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की जिल्ह्यात मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्वाचा असुन या संदर्भांतच आम्ही लक्ष घातले असुन पोलिस काका व पोलिस दिदी ही संकल्पना जिल्ह्यात सर्वत्र राबविली जाणार असुन याचे काम अंतिम टप्यात आले आहे.माढ्यात नात्याला कलंक लावणारी घडलेली घटना नक्कीच प्रत्येकाला चिड आणणारी असुन घटनेचा अजुनही सखोल तपास सुरु आहे.गुन्हात वापरण्यात आलेली हत्यारे.वाहने जप्त केली असुन तपासातून काही नवे धागे दोरे समोर आल्यास त्यादृष्टीने तपास होईल.सामाजिक दृष्ट्या अत्यंत दुर्देवी असलेल्या या  घटनेच्या गुन्ह्याची उकल माढा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत केल्याने पोलिस निरिक्षक बि.एस.खणदाळे,पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद शेख,याांचेसह माढा पोलिसांचे त्यांनी विशेष अभिनंदन करुन रिवॉर्ड दिले. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, करमाळा आणि मंगळवेढा पोलिस ठाण्याचा गुन्हेगारीचे प्रमाण  लक्षात घेता तेथे नवीन पोलिस ठाणे निर्माण करणे गरजेचे आहे तसे प्रयत्न सुरू असून लवकरच या प्रयत्नांना यश येईल असे ही त्यांनी शेवटी बोलताना  सांगितले. 
(चौकट) काय आहे पोलिस काका ...पोलिस दिदी संकल्पना-
सध्या जिल्ह्यात निर्भया पथक कार्यरत आहे.प्रत्येक दीड ते दोन हजार विद्यार्थी विद्यार्थिनी मागे एक पोलिस काका आणि एक पोलिस दिदी ची नियुक्ती  असणार आहे.ज्या त्या पोलिस स्टेशन हद्दीतील एक महिला व एक पोलिस कर्मचारी नियुक्ती केली जाणार असुन त्याचे मोबाईल नंबर ज्या त्या महाविद्यालयात दिले जाणार आहेत.ज्यांना मदतीची गरज असेल त्यांनी त्या नंबरवर फोन करून मदत मागावी  ती तात्काळपणे दिली जाईल अशी ही संकल्पना आहे.
 या संदर्भात आवश्यक माहिती गोळा केली जात आहे लवकरच ही संकल्पना कार्यरत करण्यात येणार असल्याचे सांगुन या संकल्पनेचा फायदा मुलींना होणार असल्याचा विश्वास हिम्मत जाधव यांनी व्यक्त केला.
Reactions

Post a Comment

0 Comments