Hot Posts

6/recent/ticker-posts

शिक्षकांच्या प्रश्नासाठी प्रा सुभाष माने यांचा लढा सुरूच

 शिक्षकांच्या प्रश्नासाठी प्रा सुभाष माने यांचा लढा सुरूच

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे समवेत घेतली उपसंचालक पानझडे यांची भेट

पानझडे यांचेकडून सकारात्मक प्रतिसाद, पुढील कार्यवाही सुरू


   पंढरपू (कटूसत्य वृत्त):-राज्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य सुभाषराव माने सर यांनी शिक्षकांच्या प्रश्नाची सोडवणूक व्हावी यासाठी पूर्वीपासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. त्यांना यशही मिळाले आहे. त्यामुळे सेवानिवृत्ती नंतरही त्यांनी आपली परंपरा कायम ठेवीत हा लढा सुरूच ठेवला आहे.

           शिक्षण आयुक्त कार्यालयातील उपसंचालक पानझडेसाहेब यांच्याशी कोकण विभागाचे शिक्षक आ. ज्ञानेश्वर म्हात्रे व महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य सुभाषराव माने सर या दोघांनी मिळून नुकतीच भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली आहे. यामध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळून पुढील कार्यवाही सुरू ठेवली आहे.

या  झालेल्या भेटी मध्ये विशेषतः रयत शिक्षण संस्थेच्या विनाअनुदानित असलेल्या शिक्षकांच्या मान्यतेबाबत चर्चा केली. त्या असणाऱ्या एन टी क संवर्गातील शिक्षकांच्या जुनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांना  मान्यता देण्याविषयी कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कारवाई करावी .अशा प्रकारची विनंती केली असता,  पानझडेसाहेब यांनीही याच्यावरती सकारात्मक चर्चा केली.तातडीने पुणे विभागाचे उपसंचालक माननीय राजेंद्र अहिरे  यांना संबंधित सात शिक्षकांचे  प्रस्ताव संबंधित कादपत्रासह आपल्या वरिष्ठ कार्यालयास पाठवावेत. अशा प्रकारचे आदेशही दिले. आहेत.एन टी क संवर्गात रोस्टरमध्ये जागा शिल्लक नसल्यामुळे त्यात 88 पदे शिल्लक असल्यामुळे एन टी क मधील सात शिक्षकांना एन टी अ प्रवर्गातील शिल्लक असलेल्या अनुशेषामध्ये परावर्तित करावे .असे आदेश दिलेले आहेत. यामुळे त्या शिक्षकांचा प्रश्न लवकरच निकालात निघणार आहे. यामुळे मानेसर यांचे प्रयत्न सफल ठरणार आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments