Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी

 लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात आज १ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. एम. एस. पाटील    सहाय्यक प्राध्यापक  कृषी महाविद्यालय पुणे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राध्यापक पी. एन.  शेळके उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने करण्यात आली. महाराष्ट्राच्या मराठी साहित्याच्या सामाजिक सांस्कृतिक इतिहासातील व ज्ञान चळवळीतील सुवर्ण अक्षरांनी लिहिलेले नाव म्हणजे अण्णाभाऊ साठे.  आपल्या साहित्य सेवेद्वारे मराठी साहित्याची पताका जागतिक पातळीवर  फडकवण्याचे काम यांनी केले असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. पी. एन. शेळके यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष एम. एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे थोर भारतीय स्वातंत्र्य सेनानी, लेखक, संपादक होते. लोकमान्य टिळक यांचा जीवन प्रवास थोडक्यात कथन केला. असे महत्तम राष्ट्रीय योगदान देणाऱ्या महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन  व आभार प्रदर्शन विद्यार्थिनी अमृता माळी व अंजली होटकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी  प्रा. ज्योती गायकवाड,  प्रा. निशा काटे, प्रा. दिपाली गुरव, प्रा. संजय वाघमोडे, प्रा. स्वप्निल कदम तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments