नीलिमा चव्हाण हिची निर्घृण हत्या केलेल्या मारेकऱ्यांना अटक करुन कडक शासन द्या
माढ्यात नाभिक समाज बांधवांचे तहसील-पोलिस प्रशासनाला निवेदन
माढा (कटूसत्य वृत्त):- कोकणच्या चिपळूण तालुक्यातील नाभिक समाजातील नाभिक समाजातील नीलिमा सुधाकर चव्हाण हिच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ नाभिक समाज राज्यभरात आक्रमक पवित्र्यात दिसत आहे.
माढा शहरातील नाभिक समाज बांधवांनी एकत्रित येऊन तहसीलदार व पोलीस अधिकार्याना निवेदन देऊन खुन्यांना तात्काळ अटक करुन कठोर शिक्षा करण्याची मागणी निवेदनातुन करण्यात आली.
नीलिमा चव्हाण ही दापोली येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेतात कार्यरत होती.बॅकेतील आपले काम आटोपून गावी जाण्यासाठी निघालेली असताना अचानक ती गायब झाली.तिचा मृतदेह समुद्रकिनारी असलेल्या दाभोळ खाडी मध्ये आढळला.या घटनेला आठवडा उलटूनही पोलिसांनी अटक न केल्याने नाभिक समाज महाराष्ट्र भर आक्रमक झालाय.या घटनेमुळे नाभिक समाजा मध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.चव्हाण हिच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करुन मारेकऱ्यांवर कडक कारवाई करावी मुलीच्या कुटूबियांना न्याय मिळावा.अन्यथा पुढील काळात समाज रस्त्यावर उतरेन असा तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातुन दिला आहे.निवेदन प्रसंगी दिनेश गाडेकर,आकाश मोरे,नागेश शेलार,संदीप मोरे,सोमनाथ डिगे,अक्षय राऊत,,बबलू शेलार,सोनू शेलार,संतोष शेलार,संतोष मोरे,यांचेसह अन्य नाभिक बांधव उपस्थितीत होते.
0 Comments