Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर सिंहगडच्या नऊ विद्यार्थ्यांची 'अटॉस सिंटेल ' कंपनीत निवड

 सोलापूर सिंहगडच्या नऊ विद्यार्थ्यांची 'अटॉस सिंटेल ' कंपनीत  निवड 






सोलापूर (कटूसत्य वृत्त):- केगाव येथील एन.बी.नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्याल यातील ९ विद्यार्थ्यांची ' अटॉस सिंटेल ' या नामांकित कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असून त्यांना वार्षिक ३.५ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे. यामध्ये फरझीन शेख, प्रतीक्षा गायकवाड, मृणाल कोळी, आरती कबाडे, समर्थ देशमुख , राजश्री म्हेत्रे, नेहा पडवळकर, समरीन बगाली, अंकिता भोसले या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.अटॉस सिंटेल ही कंपनी महिती तंत्रज्ञान आणि कार्यक्षम ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट आणि मॅनेजमेंट, टेस्टिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर सोल्यूशन्स तयार करण्यासाठी ऑटोमेशन व स्केल केलेल्या चपळ आणि क्लाउड प्लॅटफॉर्मचा फायदा घेऊन  जागतिक उपक्रमांना कोर विकसित करण्यास मदत करते. या सर्व विद्यार्थ्यांचे सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ.रवींद्र व्यवहारे व शेखर जगदे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. विकास मराठे, डॉ. दत्तात्रय गंधमल, डॉ. प्रदीप तपकिरे,प्रा. विजयकुमार बिरादार, डॉ. विनोद खरात, सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्या निकत शेख तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
Reactions

Post a Comment

0 Comments