नातवाने आज्जीला डिझेल टाकून पेटवले; आज्जीचा होरपळून मृत्यू
माढा तालुकयातील लऊळ येथील घटना
लऊळ (कटूसत्य वृत्त):-शेतातील उत्पन्नाचे पैसे आम्हाला का देत नाही याचा राग मनात धरुन तेवीस वर्षांच्या नातु ने सत्तर वर्षांच्या आजीला घरासमोर स्वयंपाक करत असताना डिझेल अंगावर ओतून पेटवून दिले. यामध्ये आज्जीचा चा होरपळून जागीच मृत्यू झाला.ही घटना लऊळ ता माढा येथे रविवारी सकाळी 9.30च्या दरम्यान भवर वस्ती वरील पंढरीनाथ शिंदे यांच्या राहत्या घरासमोर घडली आहे.
हर्षद संभुदेव शिंदे वय 23 रा . राजगुरुनगर पुणे असे नातवाचे नाव असून सौ.शांताबाई पंढरीनाथ शिंदे वय 65 रा.लऊळ असे मयत आज्जी चे नाव आहे.
कुलदीप संजय कोकाटे वय 24 यांच्या फिर्यादीवरुन कुर्डुवाडी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला कुर्डुवाडी येथील परांडा चौकात काही तासांतच अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार फिर्यादी सकाळी गाईच्या धारा काढुन दुध डेअरी वर दुध घालून घराकडे जात असताना चिंचेच्या झाडाखाली मोठा जाळ दिसला.जवळ जाऊन पाहिले असता आज्जी पेटलेली दिसली. आजुबाजुला पाहिले असता संशयित आरोपी हर्षद शिंदे रा. राजगुरुनगर पुणे हा पळून जाताना दिसला त्यास आवाज दिला तो मागे वळून पाहिले व पसार झाला. तातडीने घरी जाऊन आई वडिलांना घेऊन घटनास्थळी आलो.आईने कालवा केला असता बाजुचे लोक जमा झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
तात्काळ घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली व फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले .
पोलिस उपाअधीक्षक अजित पाटील व पोलीस निरीक्षक गोपाळ पवार ,मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत वाघमारे तपास करत आहेत.
0 Comments