छत्रपती शिवरायांचे विचार अंगीकारा
अक्कलकोट(कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्राच्या मातीतून उभे राहिलेले स्वराज्याचे स्वप्न पाहणारे आणि ते साकार करणारे एक महान व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या कार्याचा, त्यांच्या विचाराचा आणि शौर्याचा गौरव आजही होतोय, पुढे ही होत राहणार. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजा नव्हते, तर ते एक महान व्यक्तिमत्त्व होते, त्यांचे विचार आणि कार्य आपल्याला कायमच प्रेरणा देत राहील, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे संकल्पित कार्य स्वराज्याच्या हितार्थ केले, आजच्या पिढीने शिवरायांचे विचार अंगीकारणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन ख्यातनाम व्याख्याते
प्रा. नितीन बानगुडे-पाटील यांनी केले.
ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३८ वा वर्धापन दिन व गुरूपौर्णिमा महोत्सवानिमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, शुक्रवारी ख्यातनाम व्याख्याते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांचे 'छत्रपती शिवाजी महाराज' या विषयावर व्याख्यानाने ५ वे पुष्प झाले.
दरम्यान कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन राज्याचे माजी शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर, राज्य आर.पी.आय. (आठवले गट) सचिव- राजाभाऊ सरवदे, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष- महेश इंगळे, श्री व सौ. चंद्रशेखर विनायक मंत्री, झोनल मॅनेजर, बँक ऑफ इंडिया सोलापूर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अक्कलकोट तालुका अध्यक्ष- दिलीपभाऊ सिद्धे, श्री. व सौ. संजय कुलकर्णी (जीएसटी विभाग), सुरेश सूर्यवंशी, बाबासाहेब निंबाळकर, बाळासाहेब मोरे, गोव्याचे पोलीस निरीक्षक लक्सी अमोणकर, झिला पेडणेकर, अनंत मालवणकर, गुरुराज नाडगोडा, आर.पी.आय. (आठवले गट) तालुका अध्यक्ष- अविनाश मडीखांबे, सन्नी ठेंगील, गोगावचे सरपंच वनिता सुरवसे, समीर लोंढे, नागेश भिसे, नवाज भाई, नागेश बिद्री यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेले राज्याचे माजी शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांचा सत्कार न्यासाच्या वतीने करण्यात आला.
प्रा. बानुगडे-पाटील पुढे म्हणाले की, जगभरात शिवरायांचा आदर्श घेतला जातो. नेताजी सुभाषचंद्र बोस हे तुरुंगात असताना शिवचरित्राचे वाचनाच्या प्रभावाने त्यांनी वेषांतर करून तुरुंगातून बाहेर येऊन आझाद हिंद सेनेची स्थापना केली, छत्रपती शिवरायांचा महामंत्र घेऊन त्यांनी देशासाठी लढले असे सांगून, प्रा. बानुगडे- पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण, शिक्षण स्वराज्याची स्थापना, प्रेरणा देणारे कार्य, एक महान देशभक्त, कुशल प्रशासक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सरसेनापती, याबाबत अंगावर शहारे उभे करणारे शिवरायांचा इतिहास सांगून उपस्थित श्रोते गणांना मंत्रमुग्ध केले. शिवचरित्र अत्यंत सुंदर शब्दात मांडले. युवकांनी प्रचंड गर्दी केली होती. याप्रसंगी प्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्यासह मान्यवरांचा न्यासाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा कृपावस्त्र देऊन सत्कार करण्यात आला. न्यासाचे पुरोहित सोमकांत व संजय कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन झाले. न्यासाचे विश्वस्त अलकाताई जन्मेजयराजे भोसले, अर्पिताराजे अमोलराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, स्वाती निकम, तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, स्वामिनीराजे अमोलराजे भोसले आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.
चौकट
गुणीजन गौरव
विश्वनाथ गुरप्पा देवरमनी जि.प. प्राथमि शाळा, नागणसूर (कृषी), महेश रामराव घुटे, वरिष्ठ शाखा प्रबंधक, बँक ऑफ इंडिया, शाखा- अक्कलकोट (बँकिंग), रमेश शिवराया पुजारी, प्रयोगशाळा परिचर सी. बी. खेडगी महाविद्यालय, अक्कलकोट, सवाई शिवाजी चुंगीकर, सेवेकरी, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
चौकट
अन्नदान हे श्रेष्ठ दान असून, तीर्थक्षेत्र अक्कलकोटात स्वामी भक्तांसाठी जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ स्थापन करून एक मातृत्व संस्था म्हणून त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून धार्मिक कार्याबरोबरच समाज उपयोगी कार्य त्यांच्या हातून घडत आहे. अन्नछत्र हे संवेदनशीलतेचे प्रतिबिंब आहे.
- दीपक केसरकर, आमदार, माजी मंत्री
-
चौकट
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३८ वा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. माझ्यासारख्या वक्त्याला वेळोवेळी संधी देऊन ते समाज प्रबोधन करीत आहे, याचा सार्थ अभिमान आहे.
- प्रा. नितीन बानुगडे-पाटील, व्याख्या
0 Comments