स्मार्ट सिटी ची वाजते तुतारी....! शहरात सर्वत्र उघड्या गटारी...!!
अहो मेंबर.. ! कधी होणार आमचा चेंबर..?
सोलापूर (दादासाहेब निळ):- महापालिकेवर गेल्या पाच वर्षात भाजपाचे कमळ, सोलापूर शहराची स्मार्ट सिटी मध्ये घोषणा झाली. या स्मार्ट सिटी साठी कोट्यावधी रुपयाचा निधी आला मोठमोठ्या तुतारी वाजल्या सुद्धा..!
परंतु सोलापूर शहराचा पायाभूत विकास सुद्धा या स्मार्ट सिटीच्या निधीमधून भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदारांमुळे झाला नसल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. सध्या सोलापूर शहरांमध्ये डास आणि मच्छरांचे प्रमाण वाढत आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे शहरांमधील अनेक भागांमध्ये झाकण नसलेल्या उघड्या गटारीं..! सोलापूर शहरामध्ये अनेक रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे धुळीचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. मनपा प्रशासनाने गेल्या पाच वर्षांमध्ये एका कंपनीला पाच वेळा मुदतवाढ देऊन सुद्धा शहरातील ड्रेनेज लाईन आणि अनेक भागातील मल्ल निसारण केंद्राचं काम या कंपनीला पूर्ण करता आले नाही त्यामुळे पुन्हा एकदा त्या कंपनीला मुदतवाढ देण्यात येईल. आता काम मुदतीत करून घेण्याचा प्रयत्न करू असे महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता विजय राठोड यांची गुळगुळीत प्रतिक्रिया सोलापूरकरांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचं बोलत आहे. सहाव्या मुदतवाढीची फाईल 31 ऑगस्ट नंतर मनपा युवकांच्या टेबलवर येण्याची शक्यता आहे हे काम पूर्ण होईपर्यंत शहरातील नई जिंदगी, शेळगी, विडी घरकुल, अक्कलकोट रोड यासह इतर हदवाड भागांमधील नागरिकांना उघड्या गटारी आणि डास मच्छरांचे उपद्रव सहन करावा लागणार आहे. केंद्र शासनाच्या अमृत वन योजनेतून ड्रेनेस लाईन आणि मल्लनिसारण प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आलं आहे. परंतु आज पर्यंत ठेकेदारांच्या मनमानी आणि मलईदार कामामुळे ही कामे प्रलंबित राहिले असल्याचे बोलले जात आहे. महापालिका आणि ठेकेदार यांच्यामध्ये कामाच्या दर्जावरून सातत्याने संघर्ष होतात त्यामुळे हे अधिकारी या ठेकेदारांना जास्त त्रास न देता शांत बसून बघ्याची भूमिका घेतात आणि या ठेकेदारांना राजकीय वरदस्त असल्यामुळे ते जास्त कोणाचे बोलूनही घेत नसल्याचे बोलले जात आहे. एखादे काम होण्यासाठी पाच, सात वर्षे लागत असतील तर सोलापूरकरांनी आणखी किती त्रास सहन करायचा हाच खरा प्रश्न आहे.
कोरोना काळामध्ये या कंपनीने कोरोनाचे संकट दाखवून कामाला ब्रेक लावला त्यानंतर कधी कामगार मिळत नसल्याचे सांगून वेळ मारून दिली त्यामुळे या कंपनीने आजवर पाच वेळा मदत वाढ मागितली आणि तिला दिली सुद्धा परंतु तरीसुद्धा कामाला वेग येत नसल्यामुळे अशा ठेकेदारांना महापालिका पोसते तरी कशासाठी ..? असा प्रश्न सध्या नागरिकांतून विचारला जातो आहे. वेळेत काम न करणाऱ्या ठेकेदारांवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई केली पाहिजे परंतु हे अधिकारी सुद्धा राजकीय दबावामुळे ठेकेदारांवर कोणतीही कारवाई करत नसल्यामुळे ह्या ठेकेदारांचे चांगलेच फावत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. शहर आणि हद्दवाढ भागातील रस्त्यांची अक्षरशा चाळण झाली आहे. त्यामुळे "अहो मेंबर करा लवकर आमचं चेंबर" असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली असून चेंबरची ची झाकणं पूर्णपणे उघडी झाल्यामुळे अपघाताचे प्रमाण शहरांमध्ये वाढत असताना सुद्धा महापालिका प्रशासन गेंड्याची कातडी पांघरून शांतपणे याकडे बघत असल्याचे दिसत आहे. सोलापूर शहरातील रस्त्यांची बिकट अवस्था असताना काही ठिकाणी चेंबर्स वर झाकणे लावण्यात आलेली नाहीत तर काही चेंबर्स वरच्यावर बसवले आहेत त्यामुळे दुचाकीचे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रस्त्यापेक्षा चेंबर्स उंची जास्त असल्यामुळे चार चाकी गाड्यांना सुद्धा याचा त्रास होत असल्याने प्रशासन याकडे कधी लक्ष देणार..? अपघात झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा सतर्क होते. इतर वेळेला मात्र ती यंत्रणा सायलेंट मोडवर असते याचाच अर्थ या अधिकाऱ्यांना अपघात झाल्यानंतरच कामे करायचे आहेत की काय असाही प्रश्न सध्या सोलापूर करातून मोठ्या प्रमाणात विचारला जातोय
. महापालिका आयुक्त शितल तेली उगले सोलापूर शहराच्या थंडावलेल्या विकासाला गतिमान करतील का..?
कासव गतीने होणारी स्मार्ट सिटी काम सशाच्या गतीने होणार का..?
रस्ते खाली आणि चेंबर रस्त्याच्यावर हे निकृष्ट काम उत्कृष्ट होणार का..?
मलई खाऊन सुद्धा वेळेवर काम न करणाऱ्या मक्तेदारांवर दंडात्मक कारवाई होणार का..?
अशा अनेक प्रश्नांनी सध्या सोलापुरातील नागरिकांना घेरलं आहे.
.jpg)
0 Comments