Hot Posts

6/recent/ticker-posts

लम्पीचा प्रसार रोखण्यासाठी पशुपालकांमध्ये जनजागृती करावी - तहसिलदार सुशिल बेल्हेकर

  लम्पीचा प्रसार रोखण्यासाठी पशुपालकांमध्ये जनजागृती करावी

             - तहसिलदार सुशिल बेल्हेकर

                                                                                               

पंढरपूर  (कटूसत्य वृत्त):- तालुक्यात सध्या काही भागात गोवंशीय जनावरांमध्ये लम्पी आजाराचा संसर्ग वाढत असून, पशुपालकांनी  याबाबत वेळीच काळजी घ्यावी. तसेच आजाराचे प्राथमिक लक्षणे ,त्यावर करावयाच्या उपायोजना याबाबत  पशुसंवर्धन विभगगाने पशुपालकांमध्ये जनजागृती करावी.व्यापक जनजागृतीसाठी समाजिक माध्यमांचाही वापर करावा अशा सूचना तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिल्या.

शेतकी भवन, पंचायत समिती पंढरपूर येथे लम्पी  रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व करावयाच्या उपाययोजनाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस गटविकास अधिकारी प्रशांत काळे, सहायक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. एस.एस भिंगारे ,पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ.प्रियंका जाधव  तसेच तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

लम्पी आजाराचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची आहे. लम्पी हा संसर्गजन्य आजार असला तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण कमी आहे. यावेळी पशुपालकांनी जनावरांची वेळीच काळजी घेतल्यास जनावराला लम्पी आजाराची लागण होण्यापासून वाचविता येईल.पशुसंवर्धन विभागाने रोगनियंत्रण लसीकरण करण्यासाठी मोहिम राबवून एकही जनावर लसीकरणापासून वंचित राहणार याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर लम्पी या आजाराचा प्रसार वाढू नये याकरता तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी, गावचे सरपंच, ग्रामसेवक यांनी समन्वयाने काम करावे ,असे आवाहनही तहसिलदार बेल्हेकर यांनी  यावेळी केले.

लम्पी आजाबाबत सर्व पशुपालकांनी दक्षता घेणे गरजेचे असून, जनावरांचे गोठे स्वच्छ करुन त्या परिसरात जंतनाशक औषधाची फवारणी करुन घ्यावी हवेशीर वातावरण ठेवावे, गोठा परिसरात पाणी, डबके, साठणार नाही याची काळजी घ्यावी,.लम्पी स्कीन या पशुधनाच्या आजाराबाबत पशुपालकांनी घाबरून न जाता प्रशासनाने सुचविलेल्या उपाययोजनांचे पालन करावे. एखाद्या जनावरामध्ये आजाराची लक्षणे दिसल्यास तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. ग्रामपंचायतीने लम्पी आजाराची लक्षणे तसेच त्यावर करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबतची माहिती फलक प्रत्येक गावात दर्शनी ठिकाणी तसेच दुधसंकलन केंद्रावर लावावेत.या कालावधीत पशुपालकांनी  गोवंशीय जनावरांची खरेदी विक्री करु नये. असे आवाहन गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी  यावेळी केले.

तालुक्यात  गोवंशीय  जनावरे 91 हजार तर म्हैसवगीय जनावरे 89 हजार असे एकूण 1 लाख 80 हजार जनावरे असून  सध्य:  स्थितीत 62 गोवंशीय जनावरांना लम्पी आजाराने बाधित आहेत. पशुपालकांनी बाधित जनावर इतर निरोगी जनावरांपासून वेगळे करावे. जनावरामध्ये लम्प आजाराबाबत लक्षणे आढळून आल्यास तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवावे वजनावरांवर उपचार करून घ्यावेत.. बाधित व निरोगी जनावरे एकत्रित चरावयास सोडू नये, जनावरांच्या संपर्कात आलेल्या साहित्याचे निर्जंतुकीकरण करावे. असे पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. प्रियंका जाधव  यांनी यावेळी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments