ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी खचून न जाता अभ्यास केल्यास यश
नक्कीच मिळते :-अद्वैता शिंदे (नुतन डी.वाय.एस.पी)
करकंब गावची लेक अद्वैताचा एकलव्य अभ्यासिकेच्या वतीने सत्कार
करकंब (कटूसत्य वृत्त):- एकलव्य अभ्यासिका वतीने आज करकंब गावची लेक आणि अभिमान नुतन डी.वाय. एस.पी.सौ.अद्वैता शिंदे यांनी करकंब येथील एकलव्य अभ्यासिकेला भेट दिली
सुरुवातीला एकलव्य अभ्यासिकेच्या वतीने नूतन डी.वाय.एस.पी. पदी निवड झाल्याबद्दल एकलव्य अभ्यासिकेचे विद्यार्थी सौ. रुक्मिणी शिंगाडे यांच्यावतीने शाल हार आणि "एकलव्य" पुस्तक भेट देऊन सन्मान केला त्यानंतर एकलव्य अभ्यासिकेमधील सर्व विद्यार्थ्यांना अद्विता शिंदे यांचं मार्गदर्शन करीत असताना आपण स्पर्धा परीक्षा देत असताना कोणकोणत्या अडचणी आल्या त्या अडचणींवर कशी मात केली.हे सांगत असताना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हे एक मोठं आव्हान आहे,हे यश कोणाला लगेच मिळतं तर, कोणाला अनेक वर्ष अभ्यास केल्यानंतरही मिळत नाही. त्यासाठी ग्रामीण भागात एकलव्य अभ्यासिका झाल्यामुळे अभ्यास पूर्ण वातावरण यात करकंब गावी मिळत असताना नक्कीच याचा फायदा स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळेल.ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करण्यासाठी जिद्द चिकाटी नवनवीन ऍडव्हान्स असणारी पुस्तकं, आणि योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळाल्यानंतर यश नक्कीच मिळेल. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन करून अभ्यास केला तर नक्कीच यश मिळेल महिलांसाठी तर स्पर्धात्मक यश अतिशय आव्हानात्मक असून एकीकडे घर, मुलं,नातलग, सांभाळून अभ्यास करावा लागतो हे करीत असताना तारेवरची कसरत करत करत हे यश संपादन केल्यानंतर जो आनंद मिळतो तो अद्वितीय आहे.त्यासाठी सर्वांनी जिद्दीने अभ्यास करा आणि आपल्या करकंब गावचं नाव लौकिक एक अधिकाऱ्याचं गाव म्हणून मिळवा अशा सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर नंदलाल कपडेकर यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी काही टिप्स दिल्या अपयशाने खचून न जाता अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं समजून अभ्यास करा यश निश्चित मिळेल अपयशाने खचून जाऊ नका.तसेच करकंब ग्रामस्थांना युवकांना आपला वाढदिवस एकलव्य अभ्यासिकेला स्पर्धा परीक्षेच पुस्तक भेट देऊन करा.किंवा अर्थिक सहकार्य करुन करावे असे असे सांगितले.यावेळी अभ्यासिकेचे उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर दुधाणे यांनी कार्यक्रमाचे नियोजनबद्ध नियोजन केले होते.त्यामुळे एकलव्य अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांना एक प्रेरणादायी मार्गदर्शन मिळालेला आनंद सर्व विद्यार्थ्यांचे चेहऱ्यावर दिसत होता सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या शंका अद्विता ताईंना विचारून आपल्या संख्येचे निरसन केलं. यावेळी एकलव्य अभ्यासिकेचे प्रमोद रेडे संतोष भोसले, हरिश्चंद्र वास्ते, रघुनाथ जाधव साहेब राजेंद्र करपे तसेच विजय शिंगटे, एकलव्य अभ्यासिकेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0 Comments