जिद्द व चिकाटीच्या बळावर सचिन दत्तात्रय साळुंके याने अखेर महाराष्ट्र
लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत विक्रीकर निरीक्षक पदाला घातली गवसणी
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- जिद्द व चिकाटीच्या बळावर,कडवा संघर्ष करीत वडशिवणे येथील सचिन दत्तात्रय साळुंके याने अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत विक्रीकर निरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.
सचिन साळुंके हा करमाळा तालुक्यातील वडशिवणे येथील रहिवासी असून तो पुणे येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करीत होता.त्यास यशाने चार वेळा थोड्या-थोड्या गुणांनी हुलकावणी दिली.पण सचिन अपयशाने खचला नाही.विवाह होऊनही त्याने प्रयत्न सोडले नाहीत.यश नक्की मिळेल अशी त्याला अपेक्षा होती.या अपेक्षेनेच त्याला यशपर्यंत पोहचविले.त्यास आई-वडील,पत्नी व भाऊ यांनी शेवट पर्यंत प्रोत्साहन दिले.
सचिन याचे प्राथमिक शिक्षण वडशिवणे जि.प.शाळेत झाले.तर दहावी पर्यंतचे शिक्षण केम येथील उत्तरेश्वर विद्यालयात झाले.तसेच त्याने पुणे येथून कॉम्प्युटर इंजिनिअर पदवी संपादन केली होती.सचिन याने फेब्रु. २०२२ मध्ये पूर्व परीक्षा दिली होती.तर मुख्य परीक्षा जुलै २०२२ मध्ये दिली होती.त्यानंतर मुलाखत होऊन नुकताच अंतिम निकाल जाहीर झाला आहे.
या यशाबद्दल सचिन साळुंके यांचे गोरख जगदाळे,लक्ष्मण मोरे,कालिदास पन्हाळकर,पोपट (माधवराव) साळुंके,श्रीमंत कवडे,अमरजीत साळुंके व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.
0 Comments