Hot Posts

6/recent/ticker-posts

धर्मवीर शहर व शहर हद्दवाढ कर्मचारी संघटनेच्या वतीने आयुक्त शीतल तेली-उगले यांचा सत्कार

 धर्मवीर शहर व शहर हद्दवाढ कर्मचारी संघटनेच्या वतीने आयुक्त शीतल तेली-उगले यांचा सत्कार

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- धर्मवीर शहर व शहर हद्दवाढ कर्मचारी संघटनेच्या वतीने महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सोलापूर महानगरपालिकेमधील हद्दवाढ सेवकांसंदर्भात मागील वीस ते पंचवीस वर्षापासून प्रलंबित असलेले आर्थिक व अनुकंपा लाभ मा आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या कारकिर्दीत निर्णय घेण्यात आले आहे. तसेच सोलापूर महानगरपालिकेमधील अधिकारी/ कर्मचारी यांना पदोन्नती देणे, सातवा वेतन आयोगानुसार 10-20-30 योजनेचा लाभ देणे,अनुकंपा भरती व 340 पदे भरण्याबाबतचा निर्णय घेण्यात आले असून महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून प्रत्येक वेळी अधिकारी व सेवकांच्या पाठीशी असल्याने आज महापालिकेच्या धर्मवीर शहर व हद्दवाढ कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.धर्मवीर संघटनेचे मल्लिकार्जुन हुणजे, अशोक बिराजदार, प्रदीप जोशी उपरे माने, सुभाष खोबरे, वीरेंद्र उपरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments