Hot Posts

6/recent/ticker-posts

फक्त सहा महिने द्या, सोलापूर झेडपीत बदल झालेला दिसेल- सीईओ मनीषा आव्हाळे

 फक्त सहा महिने द्या, सोलापूर झेडपीत बदल झालेला दिसेल- सीईओ मनीषा आव्हाळे

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- फक्त सहा महिने मला आणखी वेळ द्या, तुम्हाला सोलापूर झेडपीत बदल झालेला दिसेल, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवळे म्हणाल्या, मला पदभार घेऊन वीस दिवस झाले आहेत. जिल्हा परिषद मुख्यालयातील स्वच्छता व कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर शिक्षण आरोग्य व इतर आणखी काही महत्त्वाची कामे सुरू आहेत. त्या कामांकडे लक्ष देण्याचची गरज आहे. जलजीवन मिशनची कामे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावयाची आहेत. त्यामुळे या महत्त्वाच्या कामांमध्ये मी व्यस्त आहे. तरीही कार्यालयीन शिस्त लावण्यासाठी दररोज मी वेळ देत आहे. कर्मचाऱ्यांनी किमान कार्यालयीन वेळेत तरी आपले काम प्रामाणिकपणे पार पाडावे, कोणतीही कामे प्रलंबित ठेवू नयेत, लोकांची अडवणूक होता कामा नये, अशा साध्या सूचना मी त्यांना दिल्या आहेत. याउपर आणखी कोणी शिस्त पाळत नसेल तर तुम्हाला सहा महिन्यात बदल दिसेल, कार्यालयीन शिस्तीसाठी दररोज सकाळी व सायंकाळी हजेरी सक्तीची केलेली आहे. कर्मचाऱ्यांना जेवणाच्या वेळेत कार्यालयात बसण्यासाठी चांगली जागा उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कामाच्या वेळेत कॅन्टीन किंवा जिल्हा परिषदेच्या आवारात कर्मचाऱ्यांनी फिरू नये अशा सूचना दिलेल्या आहेत. तरीही या सूचनांचे कोणी पालन करीत नसेल तर त्यांच्यामध्ये मी बदल घडविल्याशिवाय राहणार नाही. मी कडक शिस्तीची आहे आणि इथे असेपर्यंत कडक शिस्तीचेच काम करणार, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात बरीच विकास कामे सुरू आहेत. याबाबत माहिती दिली जात नाही, अशी तक्रार पत्रकारांनी केली. स्वच्छ भारत मिशनचा लवकरच हिशोब घेतला जाईल, असा इशाराही सीईओ आव्हाळे यांनी यावेळी दिला.

Reactions

Post a Comment

0 Comments