अविस्मरणीय माणसांच्या सानिध्यात व्यक्तिमत्व घडले -सुनेत्रा पंडित
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अविस्मरणीय माणसांच्या सानिध्यात व्यक्तिमत्व घडले असे त्यांनी आज योगविहार येथे आंतरराष्ट्रीय प्रार्थना योगl मंडळ यांच्या बौद्धिक व्याख्यानमाला व संस्कृतिक कार्यक्रमाचे पहिले पुष्प गुंफताना त्यांनी म्हटले. पुढे त्यांनी त्यांच्या जीवनात ज्या दहा व्यक्ती प्रत्यक्ष भेटल्या त्यांचे अनुभव, त्यांचा सहवास याबाबतच्या आठवणी त्यांनी सांगितले. यामध्ये प्रा. द,रा. बेंद्रे यांनी छोट्या मुलीचा सत्कार केला व प्रेरणादिली. विजय कॅप्टन यांनी पत्नीला स्वतः भरत काम करून वाढदिवसाची साडी दिली, दोन्ही हातच नसलेला जयंत वकील झाला, पायच नसलेला वसंत स्वतःच्या पायावर कसा उभा राहिला. रत्नकांत राजे यांनी अंधांची ट्रिप काढली, त्यात मी डोळस असे अनुभव घेतले, पत्नीला गृहलक्ष्मीला नमस्कार करून गावाला जाणारे राऊत काका यांचीआठवण सांगितली. या काल्पनिक कथा नाहीत, या सुनेत्राने अनुभवलेल्या, पाहिलेल्या सर्व जीवंत कथा आहेत, त्या श्रोत्यांनाअविस्मरणीयच वाटल्या. त्यांनी या लोकांचा अनुभव अगदी त्यांच्या रसाळ वाणीतून कथन केला. भाषणाला खूप चांगला प्रतिसाद श्रोत्याकडून मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात चनबसप्पा अलमेल व सौ गंभीरे यांच्या भक्ती गीताने झाली. आजच्या प्रमुख वक्त्या श्रीमती सुमित्रा पंडित यांच्या हस्ते श्री चे मूर्तीस पुष्पहार अर्पण केल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मायनाळ यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्रीमती सुनेत्रा पंडित यांचा सत्कार जयश्री करजगी यांच्या हस्ते पुष्पहार व शाल देऊन करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी बाबासाहेबसाहेब कुलकर्णी यांनी उपस्थितांच आभार मानले व आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागनाथ चौगुले यांनी केले.
आजच्या कार्यक्रमास निळकंठप्पा कोनापुरे, विश्वनाथ म्हेत्रे ,वेदमूर्ती बसवराज स्वामी, सौ संध्यारजनी दानवे, सौ. दिकोंडा, सुभाष कुलकर्णी इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
0 Comments