स्वातंत्र्यदिनानिमित्त कुरूलच्या ९ शाळांमध्ये विविध स्पर्धा संपन्न
ग्रा.पं.सदस्या मोहिनी घोडके यांचा उपक्रम
कुरुल (कटूसत्य वृत्त):- भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मोहोळ तालुक्यातील कुरुल व परिसरातील ९ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये कुरुलच्या ग्रामपंचायत सदस्या मोहिनी घोडके यांच्यावतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धा संपन्न झाल्या असून या स्पर्धेमधून विजेत्या विद्यार्थ्यांना १५ ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात येणार आहे.
देशाचा आजादी का अमृत महोत्सव या वर्षात घरोघरी साजरा झाला. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून देशाच्या ७६ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी परिसरातील ९ जिल्हा परिषद शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा व चित्रकला स्पर्धा या स्पर्धा राबविण्याचे आयोजन विद्यमान तथा शिक्षणप्रेमी ग्रा.पं.सदस्या मोहिनी घोडके यांनी संकल्पना मांडली. या संकल्पनेला सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी समंती दर्शविली. यामधून प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक इयत्तेमधून ३ क्रमांक निवडले जाणार आहेत. यासाठी प्रथम ट्रॉफी व प्रशस्तीपत्र, द्वितीय क्रमांक मेडल व प्रशस्तीपत्र आणि तृतीय क्रमांक शालेय साहित्य व प्रशस्तीपत्र असे देण्यात येणार असून या बक्षिसांचे वितरण १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण कार्यक्रम झाल्यानंतर ज्या त्या शाळांमध्ये केले जाणार असल्याची माहिती घोडके यांनी दिली.
-चौकट
यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल
- कुरुल परिसरातील प्रमुख शाळेसह ९ जिल्हा परिषद वाड्या वस्तीवरील शाळेमध्ये या विविध स्पर्धा राबविल्या असून यामुळे विद्यार्थ्यांची स्टेज डेअरींग वाढेल, त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. शिवाय दिलेल्या बक्षीसांमुळे त्यांना प्रेरणा देखील मिळेल.
0 Comments