Hot Posts

6/recent/ticker-posts

येणाऱ्या निवडणुकांसाठी शिवसेना ताकदीने बाहेर पडेल : कोळी

 येणाऱ्या निवडणुकांसाठी शिवसेना ताकदीने बाहेर पडेल : कोळी

 सिद्धेवाडी येथे युवा सेनेच्या शाखेचे उद्घाटन
 कुरुल (कटूसत्य वृत्त):- शिवसेना हा पक्ष नसून समाजासाठी काम करणारी सक्षम संघटना आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करत असताना जनतेची बादल की जपण्याची शिकवण स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेतून कितीही बाहेर पडले कितीही गद्दारी गेली तरी शिवसेनेला तसूबाई फरक पडणार नाही. येणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी  शिवसेना तक तिने बाहेर पडेल आणि जोमात भगवा फडकवेल असे प्रतिपादन युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी केले आहे.
 मोहोळ तालुक्यातील सिद्धेवाडी येथे शिवसेना अंतर्गत असलेल्या युवासेनेच्या शाखा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.   यावेळी व्यासपीठावर पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, युवा सेना विभागीय सचिव पूजा ताई खंदारे, तालुकाप्रमुख अशोक भोसले, माजी तालुकाप्रमुख काका देशमुख, प्रकाश पारवेदिपाश्री शिंदे, नितीन शिरगुर, जगु माने, शिवसेना शाखाप्रमुख लक्ष्मण माने, सचिन माने, राजु माने,  दिनकर माने  यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments