Hot Posts

6/recent/ticker-posts

रक्षाबंधनच्या निमित्ताने पवार आणि अभिजीत पाटील नाते अधिक मजबूत

 रक्षाबंधनच्या निमित्ताने पवार आणि अभिजीत पाटील नाते अधिक

मजबूत


*सुप्रिया सुळे यांनी चक्क चेअरमन अभिजीत पाटलांच्या हातावर बांधली

 राखी*



पंढरपुर (कटूसत्य वृत्त):-राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला होता. यामध्ये राष्ट्रवादीत दोन भाग पडले होते. अशातच विठ्ठल सह साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी मात्र शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठेने उभे राहण्याचा निर्णय घेतला होता. याबाबतीत मिळालेले फलित म्हणून थेट अभिजीत पाटील यांना रक्षाबंधनाच्या दिवशी खा.सुप्रिया सुळे यांनी राखी बांधले असल्याने निष्ठा मजबूत झाली आहे. ही राखी म्हणजे पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्यासाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे.

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन  अभिजीत आबा पाटील मुंबई यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी अभिजीत पाटील यांना राखी बांधली आहे.

राष्ट्रवादीत सुरू असलेल्या घडामोडीत सत्तेकडे न झुकता केवळ पवार यांच्यावर मनापासून निष्ठा ठेवली आहे. यामुळे अवघ्या सोलापूर जिल्ह्यातील पवार गटाची महत्वाची जबाबदारी चेअरमन यांच्यावर येणार असून पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्याचे केंद्रबिंदू ठरणार आहे. हे मात्र नक्की दिसत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments