लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात कृषी क्षेत्रातील
करिअर व संधी मार्गदर्शनपर व्याख्यान
सोलापूर (कटुसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात कृषी क्षेत्रातील करिअर व संधी या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी विद्यार्थी रविचंद्र देगील (एमबीए ॲग्री, डॉ. राजेंद्र प्रसाद ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटी पुसा बिहार) उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. कृषी व्यवसाय व्यवस्थापन क्षेत्रात विस्तृत संधी असून त्या साध्य करण्यासाठी जिद्द, चिकाटी व सातत्य विद्यार्थ्यांमध्ये असणे आवश्यक आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी फक्त नोकरीच्या मागे न लागता विविध कृषी व कृषी संलग्नित व्यवसायातील कौशल्य आत्मसात करून त्यात स्वतःला सिद्ध करून समाजातील इतरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात असे प्रतिपादन प्रमुख अतिथींनी केले. यासोबतच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर संदर्भात मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. तसेच ॲग्री एमबी करण्यासाठी असणाऱ्या परीक्षा, त अभ्यासक्रम, शैक्षणिक पात्रता, याबद्दल माजी विद्यार्थी रविचंद्र देगील यांनी माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी उज्वल भविष्यासाठी या क्षेत्रातील संधी स्वीकारून त्या दृष्टीने योग्य ती पावले उचलावीत कसे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. नवनाथ गोसावी यांनी विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. स्वप्निल कदम यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

0 Comments