Hot Posts

6/recent/ticker-posts

जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन चे कामांना गती द्या - सिईओ आव्हाळे

 जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन चे कामांना गती द्या - सिईओ

 आव्हाळे  नळकनेक्शन चे कमी काम असलेल्यांना कारणे दाखवा नोटिसा 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन चे कामांना गती द्या. हर घर जल व ओडिएफ प्लस च्या कामात दोन आठवड्यात प्रगती दाखवा. असे सुचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिल्या. 

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज गटविकास अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता, संस्थांचे प्रतिनिधी यांची सिईओ मनिषा आव्हाळे यांचे अध्यक्षतेखाली जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आढावा बैठक घेणेत आली. या बैठकीस उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता गाडेकर, भूजल सर्वेक्षण चे वरिष्ठ भुवैज्ञानिक प्रमुख उपस्थित होते. 

जल जिवन मिशन ची कामे नोव्हेबर अखेर पर्यंत पुर्ण करावयची आहेत. सध्या समजावून सांगितले जात आहे. स्वच्छ भारत मिशन व जल जीवन मिशन ची कामांचा चांगला दर्जा राहिल या दृष्ट्रीने नियोजन करा.

जलजीवन च्या  सुरू न झालेल्या कामांना मंगळवार पर्यंत मुदत 

…………….,

जलजीवन मिशन अंतर्गत कामांचे वर्क आॅर्डर देऊन येत्या मंगळवार पर्यंत कामे सुरू न केलेस संबंधित ठेकेदार यांचे वर कारवाई करणेत येणार आहे. दंडात्मक कारवाई करून काळ्या यादीत टाकले जाईल. ही शेवटची संधी असेल असा स्पष्ट इशारा सिईओ आव्हाळे यांनी दिला. 

हरघर नल से जल गाव 

व वैयक्तीक नळ कनेक्शन पुर्ण करा

..…………

केंद्र शासनाने दिलेल्या सुचना नुसार हरघर नल से जल गाव या साठी ग्रामसभांचे ठराव घ्या. 

वैयक्तीक नळ कनेक्शन कामे वेळेत पुर्ण करा. असे सांगत काम कमी असलेल्या मंगळवेढा, पंढरपूर व कुर्डूवाडी या तालुक्यातील संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांनी कारणे दाखवा नोटिसा देणेचे सुचना सिईओ आव्हाळे यांनी दिल्या. 

काम न करणारे संस्थांचे वेतन अदा केले जाणार नाही असे स्पष्ट सांगून कामाच प्रगती दाखवावी लागेल. शासन या बाबींवर खर्च करत आहेत तो वाया जाता कामा नये. नव्याने होणारे शौचालया दर्जा चांगली ठेवा. शौचालय वापरात आणा. स्वच्छता ठेवा. अशा स्पष्ट सुचना सिईओ मनिषा आव्हाळे यांनी दिल्या. 

या प्रसंगी बोलताना उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव म्हणाले, सोलापूर जिल्हा जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण मध्ये राज्यात पहिला टाॅप टेन मधील राहिल याची दक्षता घ्या. ओडिएफ प्लस मध्ये माॅडेल गाव करणेत सोलापूर जिल्हा राज्यात पहिल्या दहा मध्ये आहे. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन ची कामे वेळेत पुर्ण  झाली तरच माॅडेल गावांची संख्या वाढणार आहे. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन मधील ७५ टक्के ग्रामपंचायत स्तरावर कामे करावयाची आहेत तर उर्वरीत गावांची कामे जिल्हा स्तरावरून ई निविदे द्वारे होणार आहेत. असेही उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी सांगितले. कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी कामे प्रलंबित ठेऊ नका. पीएमए व त्रयस्थ संस्था यांनी समन्वय ठेऊन काम करावे. अशा सुचना दिले. संस्था मुळे कोणतीही कामे थांबू नयेत याची काळजी घ्या अशा सुचना दिल्या. 

माळशिरस तालुक्याते अभिनंदन ..! 

…. ………

हर घर जल नल से जल या विषयात चांगले काम केले बद्दल गटविकास अधिकारी विनायक गुळवे व प्रभारी उप अभियंता बाबर यांचे सिईओ मनिषा आव्हाळे यांनी अभिनंदन केले.

Reactions

Post a Comment

0 Comments