माढा आमदार बबनदादा शिंदे नेत्रालयाचा शुभारंभ
माढा (कटूसत्य वृत्त):-माढ्यातील आमदार बबनदादा शिंदे नेत्रालयाचा शुभारंभ शुक्रवारी (ता.१ सप्टेंबर) सकाळी दहा वाजता होणार असल्याची माहिती माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या हस्ते तसेच सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे,सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने, आमदार संजयमामा शिंदे, माढेश्वरी बॅंकेचे उपाध्यक्ष अशोक लुणावत यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार बबनराव शिंदे म्हणाले की,वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या रक्तदान शिबीरात आतापर्यंत २६०० बाटल्या रक्तदान संकलित झाले असून १ सप्टेंबरपर्यंत ७ हजार बाटल्या रक्तदान होणार आहे.एक लाख वह्या वाटप केल्या जाणार आहेत.सर्वसामान्य, गरजू, गरीब रूग्णांच्या अतिशय माफक दरात दर महिन्याला नेत्रशस्त्रक्रीया या रूग्णालयात होणार आहेत.आधुनिक तंत्रज्ञानाच्या सर्व प्रकारच्या नेत्रशस्त्रक्रियांसाठी आवश्यक असणारी सुमारे एक कोटी रुपयांची सर्व यंत्रसामुग्री माढयातील रूग्णालयात आणली आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हे अत्याधुनिक नेत्रालय आहे. या कार्यक्रमास नेत्ररोग तज्ञ डॉ. रागिणी पारेख, प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर,शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे, कमलाभवानी शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे, सोलापूरच्या डॉ. व्ही. एम. मेडिकल काॅलजचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, माढा वेल्फेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष धनराज शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, तहसिलदार विनोद रणवरे, जिल्हा अंध्यत्व निवारण समितीचे प्रमुख डॉ. गणेश इंदुरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी थोरात, गटविकास अधिकारी महेश सुळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे आयोजक व संकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक लुणावत यांनी सांगितले.
0 Comments