*शिक्षक सहकार संघटनेच्या जिल्हा संघटकपदी विशाल नाईक, माढा
तालुकाध्यक्षपदी शिवाजी कदम*
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या प्रश्नांबाबत आक्रमकपणे लढणारी संघटना म्हणून ओळख असणाऱ्या शिक्षक सहकार संघटनेच्या सोलापूर जिल्हा संघटकपदी विशाल नाईक व माढा तालुकाध्यक्षपदी शिवाजी कदम यांची टेंभुर्णी ता. माढा येथे कार्यकारिणीच्या सभेत निवड करण्यात आली. राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड ,राज्य सरचिटणीस निलेश देशमुख यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी राज्य कार्याध्यक्ष दिपक परचंडे, राज्य उपाध्यक्ष राहुल मसुरे , सोलापूर जिल्हाध्यक्ष रविराज खडाखडे, जिल्हा सचिव सचिन निरगिडे, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र जेटगी, बार्शी तालुकाध्यक्ष बजरंग कोळी उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित पुणे विभागीय अध्यक्ष संजय दवले,राज्य संघटक विठ्ठल टेळे, जिल्हा महिला अध्यक्ष सुवर्णा गाडे ,जिल्हा संपर्कप्रमुख सुमंत मुंडे,दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष सिद्धाराम कोळी, तालुका सरचिटणीस सोमलिंग बिराजदार, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष राजेंद्र पडदूने,तालुका सचिव सत्यनारायण नडीमेटला, जिल्हा संघटक सुनील पवार ,प्रसिद्धीप्रमुख नेहरू राठोड, दीपक कांबळे, श्रीमंत कोळी, यल्लाप्पा विटकर गणेश नागणसूरे, नागनाथ बिराजदार, विश्वनाथ राठोड, तानाजी व्हनमाने, प्रकाश खुरंगुळे, शिवाजी शिंदे आदींनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी विद्यार्थी व शिक्षक हिताच्या मागण्या सोडवण्यासंदर्भात काम करणार असल्याचे नाईक व कदम यांनी सांगितले.
0 Comments