Hot Posts

6/recent/ticker-posts

करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण मोहीमेला सुरूवात

 करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण मोहीमेला सुरूवात

यंदापासून लेकी बरोबर लेकाचं,आईचं,वडीलांच,आजीचं आजोबांचं ही झाड लावणार

करकंब (कटूसत्य वृत्त):- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमच्या वतीने आज प्रातिनिधिक स्वरूपात भारतीय जातींच्या झाडांच वृक्षारोपण करण्याला सुरुवात झाली.

आज पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सकाळ तनिष्का समूहाचे प्रमुख रजनीश जोशी, अजय आदाटे, चेअरमन अग्रीकॉस पुणे,शहाजी घाडगे, डायरेक्टर, अग्रीकॉस,आसराचे मॅनेजर प्रकाश आगाशे,तनिष्का सातारा प्रमुख प्रकाश चव्हाण,तनिष्का समन्वयक मोहन काळे, सरपंच शरदचंद्र पांढरे,सुदाम महाराज पिसे, पत्रकार सुर्यकांत बनकर मनोज पवार,तनिष्का अध्यक्षा वृषाली बोधे आणि तृप्ती पुरवत, सर्व तनिष्का सदस्या आणि करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम यांच्या उपस्थितीत संपन्न झाला 

गेल्या दीड वर्षापासून सुमारे ४०० झाड जोपण्यास काम लेकरागत टीम करीत असताना यावर्षी ही पावसाळ्याच्या सुरुवातीला झाड लावण्यासाठीची मोहीम करकंब गावच्या लेकी बरोबर यावर्षी पासून सुरू करीत असताना यापुढील काळात लेकाचं झाड,वडीलांच झाड,आजीच झाड,आजोबांचं झाड,आणि वाढदिवसाच्या निमित्ताने झाड लावून सर्वांच्या झाडाच्या रुपात आठवणींनी करकंब गाव भविष्यकाळात नक्कीच हरीतमय करण्याचा प्रयत्न करणार आहोत.सध्या प्रत्येक मनुष्याला सावली पाहिजे पण झाड लावायला नकोय ही भावना दूर करुन‌ झाड लावण्यासाठी आणि जोपासन्यासाठी सर्वांनी सहभागी होणं अपेक्षित असून भविष्यात अतिशय महत्त्वाचा वाटा या मोहिमेअंतर्गत होणार आहे तरी सर्व करकंबकर ग्रामस्थांनी ही झाड वाढवण्यासाठी सहकार्य करावे.तसेच कोणाच्या अंगणात आपल्या आवडीच झाड लावायचे असेल तर झाडं देण्याचीही आमची तयारी असून ते झाड वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करण आवश्यक आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments