सद्गुरू बहुउद्देशीय सामाजिक संस्था व सुयश इन्फोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावी व बारावी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
विद्यार्थ्यांसाठी करियर समुपदेशन कार्यक्रम संपन्न

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सुयश इन्फोटेक कॅम्पुटर ट्रेनिंग सेंटर मध्ये सद्गुरु बहुउद्देशीय सामाजिक संस्था व सुयश इन्फोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. दहावी व बारावीनंतर कोण कोणत्या क्षेत्रात त्यांना संधी उपलब्ध आहे. आणि करिअर कसे निवडायला पाहिजे? शासकीय व प्रायव्हेट या दोन्ही क्षेत्रात दहावी व बारावीनंतर कोणत्या संधी उपलब्ध आहेत. मार्गदर्शनाच्या करिअर समुपदेशन सेमिनार मध्ये करण्यात आले. करिअर समुपदेशन यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज अतिथी म्हणून ज्योती पतंगे, धनंजय माने ,लता कुंभार आरोग्य व योगा या क्षेत्रातील मार्गदर्शन केले. तसेच देवा खजिनदार यांनी दृकश्राव्य व चर्चासत्र पद्धतींचा वापर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचे निरसन केले. तसेच शितल कटारे यांनी कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालन भाग्यश्री वंजारे यांनी केले तर प्रास्ताविक शुभांगी लचके यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमास सुयश इन्फोटेकच्या संचालिका शितल कटारे, सद्गुरु बहुउद्देशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भाग्यश्री वंजारे तसेच संस्थेचे सदस्य शुभांगी लचके, अश्विनी जाधव, रवींद्र गोयल ,निकिता राठोड, लता कुंभार , माधुरी चव्हाण कार्यक्रमास उपस्थित होते.
0 Comments