Ads

Ads Area

रत्नागिरी- सोलापूर महामार्गावर सांगोलानजीक वळण रस्ता करावा:- अशोक कामटे संघटना

रत्नागिरी- सोलापूर महामार्गावर सांगोलानजीक वळण रस्ता करावा:- अशोक कामटे संघटना 

सांगोला शहरात येणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात गैरसोय राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष

           सांगोला (कटुसत्य वृत्त): मिरज दिशेने सांगोलाकडे येणाऱ्या राज्य मार्गाकडून  नागरिकांना, वाहनांना सांगोला वळण दिलेले नाही .त्यामुळे सर्वच वाहनांची दैनंदिन मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. याबाबतचे निवेदन शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्यावतीने सोलापूर येथील प्रकल्प संचालक अधिकारी  राष्ट्रीय महामार्ग, जिल्हाधिकारी, सोलापूर यांना देण्यात आले आहे.

           याबाबत अधिक माहिती अशी संपूर्ण कोकण ,कोल्हापूर, सांगली, मिरज कडून सोलापूर दिशेने या मार्गावरून सांगोला शहरात प्रवेश करू इच्छिणारी वाहने फलक नसल्याने थेट मार्गावरून दिशेने वाहने सुसाट शहर सोडून बाहेर 7 ते 10 किलोमीटर गेल्यावर पूर्ण लक्षात येत आहे . राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सांगोलाकरिता वळण कमलापूर नजीक दिल्याने सहसा वाहनधारकाच्या निदर्शनास येत नसून जरी या मार्गाने गेली तरीपण हॉटेल माऊलीपर्यंत संपूर्ण विरुद्ध,  चूकीच्या दिशेने प्रवास करावा लागत आहे. प्रसंगी मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही .शहरात येणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे राष्ट्रीय महामार्ग विभागा या समस्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे,

           त्याकरिता सूतगिरणीच्या पुढे डाव्या बाजूला माऊली पेट्रोल पंपासमोर अधिकृत वळण व दिशादर्शकाची सोय तात्काळ करावी अशी शहर व परिसरातील नागरिकांची मागणी  आहे. याकरिता शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना प्रयत्नशील आहे . तरी संबंधित विभागाने येत्या 10  ते 15 दिवसात याची दखल न घेतल्यास रास्ता रोको करणार असल्याचे शहरवासीयांनी संघटनेमार्फत कळविले आहे, तरी तात्काळ वळण व्यवस्था करावी अशी मागणी अशोक कामटे संघटनेने एन एच सोलापूर विभागीय कार्यालय जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close