आरोग्य विद्यापीठाचे विविध प्राधिकरण निवडणूकीचा निकालविविध अभ्यासमंडळाचा निकाल जाहिर
नाशिक (कटुसत्य वृत्त):- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध प्राधिकरण मंडळातील अभ्यासमंडळाचा निकाल जाहिर करण्यात आला आहे. विविध अभ्यासमंडळासाठी दि. 20 मार्च 2023 रोजी रात्रौ उशिरापर्यंत मतमोजणी प्रक्रिया सुरु होती. विद्यापीठाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी निवडणुक निकाल जाहिर केला. या निवडणुकीत विजयी उमेदवारांचे विद्यापीठाचे कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी अभिनंदन केले आहे.
याबाबत अधिक माहिती देतांना विद्यापीठ निवडणुक निर्णय अधिकारी तथा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यापीठ प्राधिकरण निवडणुकीत अभ्यासमंडळाकरीता पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखेतील प्रि-क्लिनिकल मेडिसिन विभागात घुगे गणेश द्रोपद, करुडकर सुधा श्रीराम, माळी बाबासो यशवंत, निघुटे सुनिता गोविंद, पांडे सुषमा संतोष, पराते स्वप्ना भूपेश बिनविरोध झाले आहेत तर अभ्यासमंडळाकरीता पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखेतील पॅरा-क्लिनिकल मेडिकल विषयामधून अवारी अभिजित किसनराव व मोरे संजयकुमार राजाराम या दोनउमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.
अभ्यासमंडळाकरीता पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखेतील क्लिनिकल मेडिकल सब्जेक्ट मेडिसिन व अलाईड सब्जेक्ट धडके विठ्ठल नारायण, किनीकर आरती अविनाश, मुंबरे सचिन सिध्देश्वर, प्रधान शेखर नाना, सोनी प्रविण नगुलाल या पाच उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखेतील क्लिनिकल विषयातील सर्जरी व अलाईड विषयाकरीता बारटक्के गिरीषचंद्र, डेरे राजेश चंद्रकांत, गोडबोले हेमंत वसंतराव, हिप्परगेकर प्रशांत, जुंघारे पुष्पा, लिंगायत मारुती हे उमेदवार विजयी झाले आहेत.
पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखेतील सुपरस्पेशालिटी विद्याशाखेतील मेडिसिन व अलाईड विषयासाठी श्रीरंग बिचु दामोदर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
अभ्यासमंडळाकरीता पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखेतील सुपरस्पेशालिटी विद्याशाखेतील सर्जरी व अलाईड सब्जेक्टकरीता ओझा उमेश गुणवंतरी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
अभ्यासमंडळाकरीता पदवी व पदव्युत्तर दंत विद्याशाखेतील प्रि-क्लिनिकल विषयासाठी गोंधळेकर राजेश वसंत, नागपाल दिपक कुमार जयरामदास, पळसकर संगीता जयंत, राजपूत दिनेश विजय, संकपाळ सतिष गोपाळ, सरोदे संजय लक्ष्मणराव या सहा उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.
विद्यापीठाच्या अभ्यासमंडळाकरीता पदवी व पदव्युत्तर दंत विद्याशाखेच्या क्लिनिकल (ंदंत) विषयाकरीता हेगडे विभा राहूल, काकडे कांतिलाल आदेश, कळसकर रितेश रामभारोस, केरुडी विरेंद्र व्ही., राखेश्वर पुरुषोत्तम सखाराम व वठार जगदिशचंद्र बी. हे सहा उमेदवार विजयी झाले आहेत.
विद्यापीठाच्या अभ्यासमंडळाकरीता पदवी व पदव्युत्तर आयुर्वेद विद्याशाखेच्या प्रि-क्लिनिकल करीता बकळ निलेश गणेशराव, भुसकाडे अभय वसंतराव, जोशी लक्ष्मीकांत गोपालराव, पेटे प्रविण अर्जुनराव, सवाई राजेश विठ्ठलराव, विश्वकर्मा पंकज रामचर्य हे सहा उमेदवार विजयी झाले आहेत.
विद्यापीठाच्या अभ्यासमंडळाकरीता पदवी व पदव्युत्तर आयुर्वेद विद्याशाखेच्या पॅरा-क्लिनिकल करीता बेलोरकर समीर मुरलीधर, भोकरधनकर प्रशांत एस., दुधमल अरुण शंकरराव, जगताप अविनाश देविदास, जोशी प्रविण रघुनाथराव व खोब्रागडे प्रमोद धनराज हे सहा उमेदवार विजयी झाले आहेत.
विद्यापीठाच्या अभ्यासमंडळाकरीता पदवी व पदव्युत्तर आयुर्वेद विद्याशाखेच्या क्लिनिकल विषयातील शल्यतंत्र व अलाईड विषयाकरीता डुबे रुजुता ओमप्रकाश, लोडे दत्तात्रय सोमाजी, शेकोकर अनंतकुमार वंसत, मोरे रविदास वामनराव, पोधडे सुरेश शिवाजीराव, उबरहंडे स्वाती राजेश्वर हे सहा उमेदवार विजयी झाले आहेत.
विद्यापीठाच्या अभ्यासमंडळाकरीता पदवी व पदव्युत्तर आयुर्वेद विद्याशाखेच्या क्लिनिकल विषयातील कायाचिकित्सा व अलाईड विषयाकरीता चंडालीया सचिन शांतीलाल, दाचेवार अर्चना सुदर्शन, गिरी राजेश मंगलराव, हजरनवीस मिहिर सुरेंद्र, फरताळे वैभव दत्तात्रय व जाधव नितीन चुडामण हे सहा उमेदवार विजयी झाले आहेत.
विद्यापीठाच्या अभ्यासमंडळाकरीता पदवी व पदव्युत्तर होमिओपॅथी विद्याशाखेच्या प्रि-क्लिनिकल विषयातील होमिओपॅथीकरीता आरोसकर मनोज रविंद्रनाथ, बनसोडे शिवाजी देवराव, धानुरे रत्नेश्वर रामराव, जतकर मानसी मंगेश, जोशी परिमल मधुकर व शागा वंदना नंदकिशोर हे सहा उमेदवार विजयी झाले आहेत.
विद्यापीठाच्या अभ्यासमंडळाकरीता पदवी व पदव्युत्तर होमिओपॅथी विद्याशाखेच्या पॅरा-क्लिनिकल विषयातील होमिओपॅथीकरीता बन्ने सुनिल बाळासो, भोसले प्रताप लक्ष्मणराव, डोळे सिताराम अशरुबा, फंुडे अजित कैलासराव, इनामदार मनिष विलास व कुलकर्णी मोरेश्वर रामचंद्र हे सहा उमेदवार विजयी झाले आहेत.
विद्यापीठाच्या अभ्यासमंडळाकरीता पदवी व पदव्युत्तर होमिओपॅथी विद्याशाखेच्या क्लिनिकल होमिओपॅथी विषयाकरीता भगत अशिष अशोक, देसरडा कांचन शांतिलाल, गिते सूर्यकांत सुखदेव, काळे अजय जगन्नाथ, कमिरे सुजाता आर., करमकर प्रसाद अवधुत हे सहा उमेदवार विजयी झाले आहेत.
अभ्यासमंडळाकरीता पदवी व पदव्युत्तर विद्याशाखेतील तत्सम विद्याशाखेतील ऑक्युपेशनल थेरपी व फिजीओथेरपी करीता पाटील प्राजक्ता श्रीकांत व येलर्थी पल्लवी प्रविण या दोन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.
विद्यापीठाच्या अभ्यासमंडळाकरीता पदवी व पदव्युत्तर नर्सिंग विद्याशाखेकरीता बिरादर विश्वनाथ एस., घुले बाळासाहेब लक्ष्मण, नैकारे विशाल रघुनाथ, श्रीलेखा राजेश, वाळे गजानन आर., घोलप प्रविण रमेश हे सहा उमेदवार विजयी झाले आहेत.
विद्यापीठाच्या विविध प्राधिकरण मंडळकारीता राज्यातील विविध 42 मतदान केंद्रावर घेण्यात आलेल्या निवडणूकीत एकूण 57.87 टक्के मतदान झाले आहे. विद्यापीठ अधिसभा, अभ्यासमंडळ व प्राधापक वगळता शिक्षक गटाकरीता मतदान घेण्यात आले होते. विद्यापीठ प्राधिकरण निवडणूकीसाठी एकूण 11742 उमेदवारांपैकी 6795 मतदारांनी मतदान केले होते. राज्यात सर्वाधिक मतदान वाशिम जिल्हयातील महिला उत्कर्ष प्रतिष्ठान आयुर्वेदिक महाविद्यालयातील मतदान केंद्रावर शंभर टक्के मतदान झाले आहे तर सर्वात कमी मतदानाची नोंद पुण्याचे आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज येथे 12.81 टक्के झाली आहे.
विद्यापीठ निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांच्या समवेत निवडणुक मतमोजणीच्या कामकाजासाठी सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलसचिव श्री. बबनराव उधाणे, उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे, विशेष कार्य अधिकारी डॉ. दत्तात्रय कुटे व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मा. उपकुलसचिव श्री. फुलचंद अग्रवाल आदी तज्ज्ञ व्यक्तींचा तसेच उपकुलसचिव श्री. महेंद्र कोठावदे, डॉ. संजय नेरकर, डॉ. सुनिल फुगारे, अॅड. संदीप कुलकर्णी, श्री. अनंत सोनवणे,श्री. राजेंद्र नाकवे, श्री. संजय कापडणीस, श्री. संदीप राठोड यांचा समावेश होता. या कामकाजाकरीता श्री. अविनाश सोनवणे, श्रीमती रंजीता देशमुख, श्रीमती शैलजा देसाई, श्री. मोहन सोळशे, श्री. संजय सुराणा, श्री. आनंद जाधव यांनी परिश्रम घेतले. यावेळी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Comments