Hot Posts

6/recent/ticker-posts

आयटीआयमध्ये 20 मार्चला शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

 आयटीआयमध्ये 20 मार्चला शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

 

सोलापूर, (कटुसत्य वृत्त) : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विजापूर रोड, सोलापूर येथे दिनांक 20 मार्च रोजी सकाळी 10 वाजता आय. टी. आय. उत्तीर्ण उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित केला असल्याचे संस्थेच्या वतीने पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

शिकाऊ उमेदवारी अधिनियम 1961 अंतर्गत हा शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा अर्थात पीएम ॲप्रेंटिसशिप मेला (पीएमएनएएम) आयोजित करण्यात आला आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व आस्थापना व आयटीआय उत्तीर्ण व अंतिम वर्ष परीक्षा दिलेले सर्व प्रशिक्षणार्थी यांनी या मेळाव्यास उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असे पत्रकात म्हटले आहे. तसेच, ज्या आस्थापनांमध्ये अद्याप शिकाऊ उमेदवारी योजना लागू केली नाही, तसेच ज्या आस्थापनांना शिकाऊ उमेदवार भरती करावयाची आहे, अशा सर्व आस्थापनांतील प्रतिनिधींनी ॲप्रेंटिस ट्रेनिंग विभागास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments