Hot Posts

6/recent/ticker-posts

जुनी पेन्शनच्या मागणीसाठी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी झाले सहभागी

 जुनी पेन्शनच्या मागणीसाठी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी झाले सहभागी

          टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त): - जुनी पेन्शन योजना लागु करावी या सह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आज दि.14 मार्च पासुन बेमुदत संप पुकारला असुन संपात माढा तालुक्यासह सोलापुर जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी सहभागी झाले आहेत अशी माहिती ग्रामसेवक युनियन चे राज्य सल्लागार लक्ष्मण तात्या गलगुंडे,व तालुका अध्यक्ष औदुंबर शिंदे यांनी दिली .

          नवीन पेन्शन योजना NPS रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना1982/1984 लागु करा, कंत्राटीकरण रद्द करा,रिक्त पदे तात्काळ भरा, अश्वसित प्रगती योजना चा लाभ द्या,या सह अन्य 18 मागण्यासाठी  राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन तसेच सर्व शासकीय, निमशासकीय शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी ,आरोग्य कर्मचारी,या सर्वांनी मिळुन दि.14 मार्च 2023 पासुन या प्रलंबित मागण्या साठी राज्यव्यापी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तेव्हा राज्यातील या बेमुदत संपामध्ये माढा तालुक्यातील सर्व ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी सहभागी झाले आहेत त्याबाबत आज पंचायत समिती कुर्डुवाडी येथे सर्व संघटना यांनी एकत्रितपणे सामूहिक निदर्शने केली  व शासनाने जुनी पेन्शन लागु करावी अशी मागणी करण्यात आली त्याप्रसंगी राज्य युनियनचे राज्य सल्लागार लक्ष्मण गलगुंडे, तालुका अध्यक्ष औदुंबर शिंदे,सरचिटणीस राजेश माळी,सोसायटी संचालक सिद्धेश्वर माळी, कार्याध्यक्ष लियाकत शेख,उपाध्यक्ष किसन माळी,महिला उपाध्यक्ष सौ.मस्तूद मॅडम,कोषाध्यक्ष दत्ता टोनपे,सहसचिव अरविंद जाधव; सलागार संदीप सावंत,संघटक आनंद शेंडे,सौ.शकुंतला माने मॅडम,सौ.मनीषा शेंडेकर मॅडम,रेश्मा पाटील मॅडम,अनिशा पठाण मॅडम,संघटना सभासद कर्मचारी महासंघाचे संजय क्षीरसागर भाऊसाहेब ,समाधान यादव भाऊसो, यांचे सह तालुकातील सर्व ग्रामसेवक,शिक्षक संघटना,लिपीकवर्गीय संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, परिचर संघटना इ जळपास.15 विविध संघटना प्रतिनिधी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याप्रसंगी एकच मिशन.....जुनी पेन्शन.... चा नारा देण्यात आला.

Reactions

Post a Comment

0 Comments