आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत मंत्री झाल्यानंतर जन्मगावी वाकाव ला पहिल्यांदाच येणार
मुख्यमंत्री शिंदेच्या वाढदिवसानमित्त १ कोटीच्या निधीतुन गुडेश्वर मंदिराचे करतील लोकार्पण,गावकऱ्यांकडून मंत्री सावंताच्या स्वागताची जय्यत तयारी

माढा (कटूसत्य वृत्त):- आरोग्यमंत्री डाॅ. तानाजीराव सावंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या गटातुन मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच माढ्यातील वाकाव या जन्मगावी येत आहेत.१० फेब्रुवारीला शुक्रवारी सकाळी ११ वाजता मंत्री सावंत येणार असल्याची माहिती बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मंत्री डाॅ.तानाजी सावंतानी वाकावचे ग्रामदैवत गुंडेश्वर मंदिराचा १ कोटींच्या स्वखर्चाच्या निधीतुन जिर्णोधार केला असुन याचा लोकार्पण सोहळा मंत्री सावंताच्या हस्ते १० फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता पार पडणार आहे.मंत्री सावंत हे गावात पहिल्यादाच येत असल्याने त्यांच्या स्वागताची तयारी गावचे सरपंच ऋतुराज सावंत यांच्यासह गावकरी करीत आहेत.माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांचेसह जिल्हा प्रशासनाकडुन देखील पाहणी सुरु आहे.मंत्री डाॅ.तानाजी सावंत हे जन्मगावी वाकाव ला हेलिकाॅप्टर ने येणार असुन हेलीपॅड ची व्यवस्था करण्यात आली आहे.
0 Comments