माढा पंचायत समितीच्या माजी महिला सदस्यास बेदम मारहाण ;मुलाला जीवे मारण्याची दिली धमकी

कुर्डुवाडी (कटूसत्य वृत्त):- तुला काय करायचे ते कर,असे लय मी बघितलेत,तुझ्या पत्रकार मुलाला जीवे मारण्याची धमकी देत चापटाने मारहाण केल्याची घटना दि.८ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास लऊळ (ता.माढा) येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पिडीत महिला ही सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या महिलेसोबत बेलाची पाने आणण्यासाठी छगन गवळी यांच्या शेतात गेली होती दुपारी साडे अकराच्या सुमारास पाने घेऊन आरोपी शरद नलावडे यांच्या शेतातील गाडीवाटेने परत येत असताना आरोपी पिडीत महिलेसह दुसऱ्या महिलेकडे तोंड करून लघवीला बसला त्यावेळी पीडित महिला रस्त्याच्या बाजूने पुढे जाऊ लागली तो परत दुसऱ्या वेळेस येऊन लघवीला बसला पिडीतेने आरोपीस विचारले तू असे का करतो त्याने हाताने चापट मारून ढकलुन दिले तुला काय करायचे ते कर असे लय मी बघितलेत तुझ्या पत्रकार मुलालाही जीवे मारण्याची धमकी दिली,त्यानंतर पिडीत महिला दुसऱ्या महिलेबरोबर घरी निघाले असता बनियन अंडरवियर एवढेच कपडे घालून तो कुर्डुवाडी-पंढरपूर रस्त्यापर्यंत दोघींचा पाठलाग करत आला तुझी माणसे कोठे आहेत त्यांना बोलवं,तुम्हाला दाखवतो असे म्हणून तो पिडीतेस मारहाण करून सोडविण्यासाठी आलेल्या दुसऱ्या महिलेला ही रस्त्यावरती ढकलून दिले त्यांनतर ह्या दोघी आरडाओरडा करू लागल्या परंतु त्याठिकाणी कोणी आले नाही त्यावर ह्या घरी आल्या पिडीतेने मुलाला घेऊन पोलिस ठाणे गाठले असे या फिर्यादीत म्हटले आहे
पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शरद नलावडे यांच्याविरुद्ध कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रांत बोधे हे करीत आहेत.अद्यापपर्यंत आरोपीस अटक झालेली नसून तो फरार आहे.
0 Comments