रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी हनुमंत कसबे यांची निवड

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक मौलावान अब्दुल कलाम सांस्कृतिक भवन येरवडा(पुणे) येथे पक्षाची पदाधिकारी निवडण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीचे अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न करण्यात आली.या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी हनुमंत कसबे यांची निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्रा राज्याचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या हस्ते उद्योग मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी राज्याचे सरचिटणीस गौतम सोनवणे,संघटक सचिव परशुराम वाडेकर,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे,पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस जितेंद्र बनसोडे,कार्याध्यक्ष बापूसाहेब गायकवाड,सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले आदींच्या उपस्थितीमध्ये ही निवड करण्यात आली.हनुमंत कसबे यांनी या पूर्वी पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी उपाध्यक्षपदी म्हणून काम केले आहे.
0 Comments