वाचन संस्कृती कधीच धोक्यात येणार नाही- ग्रंथालय संचालक क्षीरसागर
शालेय कर्मचाऱ्यांप्रमाणे ग्रंथालय कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे- कोटेवार

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ग्रंथालय कर्मचारी व चालकांनी जर मनापासून ग्रंथालय चालविण्याचा प्रयत्न केला तर वाचन संस्कृती व वाचन चळवळ कधीच धोक्यात येणार नसल्याचे प्रतिपादन ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर यांनी केले.
सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या अधिवेशना प्रसंगी प्रमुख पाहूणे व नवीन युगातील ग्रंथालयांची वाटचाल याविषयावर क्षीरसागर होते.
पुढे बोलताना क्षीरसागर म्हणाले की, ग्रंथालय कर्मचारी व ग्रंथालय चालक यांच्या अडी अडचणीची मला चांगलीच जाण आहे. आपण आपल्या हक्काची मागणी करीत असताना कर्तव्यात कसूर होणार नाही याचीही दक्षता घेणे तितकेच गरजेचे आहे. राज्यातील ग्रंथालय सक्षमपणे उभा करण्यासाठी व आपल्या मागण्या शासनाकडून 99% पूर्णत्वास घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही शेवटी क्षीरसागर यांनी दिली.
याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा. हरीदास रणदिवे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी गावा गावातील तरुणांच्या हातात तलवार देऊन "स्वराज्य" निर्माण केले आहे. त्याच स्वराज्यातील ग्रंथालय कर्मचारी व ग्रंथालय चालक गावा गावातील तरुणांच्या हातात पुस्तक देऊन "सुराज्य" निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.
तर यावेळी प्रमुख पाहूणे राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार भावूक होवून म्हणाले की, गेल्या 35 वर्षापासून वेतनश्रेणीचा प्रश्न ऐरणीवर असुन ग्रंथपाल म्हणून ७१ वर्ष झाले तरी केवळ पोटासाठी काम करावे हे दुर्देवी आहे. तर अपघातात मृत्यू झालेल्या ग्रंथपालाच्या कुटुंबीयांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. हे विदारक चित्र असुन त्याच्या साठी शासनाने विचार करण्याची गरज आहे.
केंद्र व राज्यातील सत्ताधारी ग्रंथालयांच्या माध्यमातून वाचन संस्कृती व वाचन चळवळ वाढविण्यासाठी उदासीन आहेत. यांना वठणीवर आणण्यासाठी ग्रंथालय कर्मचारी व ग्रंथालय चालकांनी एक संघ होवून लढणे गरजेच असल्याचेही शेवटी कोटेवार सांगितले.
यावेळी विचारपीठावर जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, कवियत्री वंदना कुलकर्णी, ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, निरिक्षक प्रमोद पाटील, माजी कृषी आयुक्त आबासाहेब साबळे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजयकुमार पवार, माजी अध्यक्ष गुलाबराव पाटील, कार्यवाह साहेबराव शिंदे, उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे, जयंत आराध्ये, संचालक भास्कर कुंभार व प्रदिप गाडे खजिनदार प्रकाश शिंदे, अन्सार शेख, आदीसह अन्य उपस्थित होते. आभार संचालक विनोद गायकवाड यानी मानले. तर सुत्रसंचलन दिपक पवार यांनी केले. किल्लेदार सभागृहात झालेल्या अधिवेशनात बहुसंख्येने वाचक, ग्रंथालय कर्मचारी व चालक उपस्थित होते.
आपले वाचनालय आदर्श बनविण्यासाठी मंगळवेढा येथील स्वर्गीय संजय सविता सार्वजनिक वाचनालय
ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी व ग्रंथालय चालकांनी ते आवर्जून पहावे असे आवाहन ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर यांनी केले.
0 Comments