छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे कार्य हे मानवाला एकसंघ करणारे आहे - सहा. पोलिस निरीक्षक रईसा शेख - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, January 4, 2023

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे कार्य हे मानवाला एकसंघ करणारे आहे - सहा. पोलिस निरीक्षक रईसा शेख

 छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे कार्य हे मानवाला एकसंघ करणारे आहे -  सहा. पोलिस निरीक्षक रईसा शेख

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, महिलांसह वंचितांसाठी जीवन समर्पित करणाऱ्या सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांना नारी सन्मान पुरस्काराने प्रगतशील शेतकरी राजेश शहा यांच्या आणि हस्ते प्राचार्य डॉ हारुन बागवान यांच्या अध्यक्षतेखाली पानगल हायस्कूलच्या सभागृहात गौरविण्यात आले. 

छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड शहरातील सामाजिक एकोपा वाढीस आणण्यासाठी विविध उपक्रम राबवितात, बंधुभाव निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतात यांचे हे कार्य मानवाला एकसंघ करणारे आहे. महापुरुषांनी कधी जातीभेद केले नाही आपणही त्यांच्या नावावर भेदाभेद करु नये असे मत जेलरोड पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ रईसा शेख यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी सौ.  शेख यांच्यासह डॉ फिरदोस अमजद सय्यद, नगरसेविका सौ श्रीदेवी फुलारी, जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्षा सौ निर्मला शेळवणे, जेष्ठ समाजसेविका अफरिन पटेल, उपक्रमशील शिक्षिका निकहत नल्लामंदू ॲड सरोजिनी तमशेट्टी, लक्ष्मी हायड्रॉलिक लि च्या मॅनेजर सौ सविता अकलूजकर, प्रिसिजन कॅम्प शाफ्ट लि‌ च्या सिनियर मॅनेजर सौ मैथिली देशमुख, भाजी विक्रेत्या सौ मिना गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले.

सदर कार्यक्रमास छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान जिल्हाध्यक्ष शफीक रचभरे, उपाध्यक्ष राजू हुंडेकरी जावेद बद्दी तन्वीर गुलजार कादर भागानगरी अझहर शेख रिजवान शेख , सर्फराज शेख, प्रकाश शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच सुत्रसंचलन मराठा सेवा संघाचे राम गायकवाड यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages