निवडणूक प्रक्रियेला ब्रेक..! शहराच्या विकासाला मिळेना ट्रॅक..!! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, December 27, 2022

निवडणूक प्रक्रियेला ब्रेक..! शहराच्या विकासाला मिळेना ट्रॅक..!!

निवडणूक प्रक्रियेला ब्रेक..! शहराच्या विकासाला मिळेना ट्रॅक..!!

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कोरोनामुळे सर्व राज्यातील निवडणुका पुढे ढकलल्या. त्यामध्ये सोलापूर महानगरपालिका सुद्धा पुढे निवडणुका ढकललेली महानगरपालिका आहे.
गेल्या दहा ते अकरा महिन्यापासून महापालिकेवर प्रशासक तत्कालीन ठाकरे सरकारने नेमला आहे.
सध्या सोलापूर शहराचा विकास करण्यासाठी नगरसेवक नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र आपले प्रश्न कुणाकडे मांडायचे हा मोठा प्रश्न पडलेला दिसत आहे.
जनता दरबारामध्ये जनतेच्या समस्या सुटण्यासाठी वेळ लागत आहे. त्यामुळेच लोकप्रतिनिधीशिवाय सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटू शकत असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसू लागली आहे.
गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपाच्या राजवटीमध्ये सोलापूर शहराचा विकास आश्वासन पूर्तीप्रमाणे झालेला नसल्यामुळे शहर विकासाचे अनेक प्रश्न जैसे थे आहेत. प्रशासकीय राजवटीमध्ये विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत.
सोलापूरकरांचा पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून सुटलेला नाही.
त्याचबरोबर स्मार्ट सिटी अंतर्गत झालेला रस्त्यांचा विकास सुद्धा अर्धवटच झालेला दिसत आहे.
घंटागाडीच्या अनेक समस्यांमुळे आणि नियोजन शून्य कारभारामुळे कंत्राटदारांनी कचरा मुक्त सोलापूर करण्याऐवजी या योजनेचा मोठ्या प्रमाणात कचरा करून सुद्धा अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांना अभय का दिलं असाही प्रश्न सध्या नागरिकांतून विचारला जात आहे.
तत्कालीन ठाकरे सरकारने कोरोनाला हद्दपार केल्यानंतर महापालिका निवडणुकीची जय्यत्त तयारी सोलापूर शहरासह राज्यामध्ये करण्यात येत असल्याचे वातावरण होते. परंतु त्यानंतर मात्र निवडणुकीची तारीख पुढे ढकलण्यात आल्यानंतर प्रशासकाच्या मदतीनेच सध्या शहराचा कारभार चालू आहे.
नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तांतर झाल्यामुळे ठाकरे सरकार गेले आणि शिंदे-फडणवीस सरकार आले.
शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरे सरकारने घेतलेल्या सर्व निर्णयांना युटर्न मारत नवीन निर्णय घेण्याचा सपाटा लावलेला दिसतोय.
विद्यमान आयुक्त शितल तेली उगले यांनी सोलापूर शहर विकासाकडे प्रामाणिकपणे लक्ष दिल्यामुळे सोलापूर शहराच्या विकासाला गती मिळेल असे सध्या दिसत आहे.
परंतु प्रशासकीय कामे करत असताना त्यांनाही सोलापूर शहराच्या विकासासाठी लोकांची अर्थातच लोकप्रतिनिधींची गरज आहे.
त्यामुळे प्रशासकीय राजवटीच कातडं पांगरलेल्या सोलापूर महापालिकेला सध्या गरज आहे ती सार्वत्रिक निवडणुकीची आणि सोलापूर शहराचा विकास करणाऱ्या कर्तव्यदक्ष महापौर यांची...!

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages