राष्ट्रवादी सोलापूर शहर अध्यक्ष पदासाठी अनेक मातब्बर इच्छुक.! पक्षश्रेष्ठी कोणाला देणार शहराध्यक्ष पदाची खुर्ची..!! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, December 27, 2022

राष्ट्रवादी सोलापूर शहर अध्यक्ष पदासाठी अनेक मातब्बर इच्छुक.! पक्षश्रेष्ठी कोणाला देणार शहराध्यक्ष पदाची खुर्ची..!!

राष्ट्रवादी सोलापूर शहर अध्यक्ष पदासाठी अनेक मातब्बर इच्छुक..!
पक्षश्रेष्ठी कोणाला देणार शहराध्यक्ष पदाची खुर्ची...!!

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर राज्यामध्ये शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले.
उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची पद्धत असल्यामुळे सध्या शिंदे गटात जाणाऱ्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची संख्या वाढताना दिसत आहे.
जिकडे गुलाल तिकडे खोबरे असं वागणारांची संख्येत सध्या वाढत आहे.
राज्यात सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता.
परंतु अतिशय नियोजनबद्ध पणे राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला भाजपाने पोखरून काढलेला दिसतोय.
परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला मजबूत करण्याकडे मोर्चा वळविला असून सोलापूर शहराची महापालिका ताब्यात घेण्यासाठी शहर राष्ट्रवादीच्या नेतृत्वामध्ये बदल करण्याचा विचार राष्ट्रवादीच्या पक्ष नेतृत्वाने घेतला असल्याचे वृत्त आहे. सोलापूर शहर अध्यक्षपदासाठी तत्कालीन काँग्रेसचे शहराध्यक्ष असलेल ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, माजी महापौर ॲड. यू. एन. बेरिया, प्रदेश सचिव संतोष पवार, माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, युवक शहर अध्यक्ष जुबेर बागवान आदीं ची नावे सध्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीच्या गोठात चर्चिली जात आहेत.
नुकत्याच ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर राज्यामध्ये जवळपास एक नंबर ग्रामपंचायत जिंकणारा राष्ट्रवादी हा पक्ष दिसून आल्यानंतर आता शहरांकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्व भक्कम करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी आपला मोर्चा शहराकडे वळवल्याचे दिसत आहे.
शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. पवार कुटुंबाशी गेल्या अनेक वर्षापासून निष्ठा असलेली माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शहरांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी शहर अध्यक्ष पदावर कोणाला बसवणार याकडे सर्वांचे नजरा लागले आहेत.
सत्ता येते आणि जाते परंतु सत्ते शिवाय कार्यकर्ते आणि नेते पक्षामध्ये पूर्वीप्रमाणे एकनिष्ठ राहत नसल्याचे सध्या जाणवू लागले असल्यामुळेच राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी सावध पवित्रा घेत पक्षाची धुरा तरुणांच्या हातात देण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
येत्या काळात महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणसंग्राम होणार आहे. त्या दृष्टीने सोलापूर शहर आणि जिल्ह्यामधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मजबूत करण्याकडे पक्षश्रेष्ठींचा कल असल्याचे बोलले जात आहे.
महिला शहराध्यक्ष पदासाठी विद्यमान अध्यक्ष सुनीता रोटे, काँग्रेस मधून राष्ट्रवादीत आलेल्या माजी महापौर नलिनी चंदिले, शशिकला कस्पटे आधी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.
सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदासाठी सुद्धा अनेकजण नजरा लावू बसले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages